घरमहाराष्ट्रAshok Chavan : अशोक चव्हाण यांची योग्य ठिकाणी मदत घेणार - देवेंद्र...

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांची योग्य ठिकाणी मदत घेणार – देवेंद्र फडणवीस

Subscribe

आम्हाला जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्याचा माझा व्यक्तिगत निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे. ‘अशोक चव्हाण यांची कुठे मदत घेईची हे आम्हाला माहिती आहे”, असे सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

काँग्रेसमधील अनेक नेते आहे की, तुम्ही विकासाच्या मुद्यावर भाजपामध्ये यावे? या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणाले, “हा माझा पहिलाच दिवस आहे. माझ्यावर ऐवढी गुगली टाकू नका. हे काम चंद्रशेखर बावनकुळे खूप जोमाने करत आहेत. त्यांना गरज वाटली तर मी त्यांना मार्गदर्शन करेन, असे ते म्हटले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशोक चव्हाण यांची कुठे मदत घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. योग्य वेळी आम्ही त्यांची मदत घेऊ, असे ते म्हणाले.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमदेवारी मिळणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यसभेत कोणाला उमदेवारी द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यानंतर कळेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आम्ही कोणतेही टार्गेट घेऊन चालत नाही. ज्या नेत्यांना योग्य वाटते. ते आमच्याशी चर्चा करत आहे. खरे आहे काही नेते आमच्या संपर्कात आहे. आम्हाला जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरू केले – संजय राऊत

- Advertisement -

भाजपाला पक्ष फोडल्याशिवाय राजकारण करता येत नाही, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एवढ्या वर्षांची पुण्याई सोडून हे लोक भाजपामध्ये का येत आहेत? कारण काँग्रेसला आपले घर सांभाळता येत नाहीत. काँग्रेस हे भाजपाला विरोध करता करता ते देशाच्या विकासाला देखील विरोध करू लागले आहेत आणि त्यांनाच त्यांचे नेते सांभाळात येत नाही. त्यामुले काँग्रेसने त्यांचे आत्मचिंतन करावे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -