Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नांदेडमध्ये पोलिसांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना भयानक - अशोक चव्हाण

नांदेडमध्ये पोलिसांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना भयानक – अशोक चव्हाण

पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

Related Story

- Advertisement -

नांदेड जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरनाच्या पार्श्वभूमीवर शीख समजाला होळीनिमित्त काढण्यात येणाऱ्या हल्ला मोहल्ला मिरवणूकीची परवानगी नाकारली होती. शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला मिरवणूक काढण्याची परवानगी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नाकारल्यामुळे संतप्त शीख तरुणांनी नंग्या तलवारींसह पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केला. या हल्ल्यात ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये गुरुद्वारा हिंसाचाराचा अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला आहे. नांदेडमधील गुरुद्वारा बाहेर घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. अतिशय चुकीचे घडले आहे. परंतु याबाबत पोलीस प्रशासन सखोल चौकशी करत आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्या कडक कारवाई करतील असे नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले पालकमंत्री अशोक चव्हाण

गुरुद्वारामध्ये ठरल्याप्रमाणे बाबाजींनी अश्वासन दिले होते की, बाहेर येऊन मिरवणूक काढणार नाही. अशा प्रकारची भूमिका घेतलेली असताना काही मंडळींनी लावलेली बैरिकेट तोडून काही तरुण बाहेर पडले. यावेळी पोलीसांनी आडवण्याचा प्रयत्न केला होता. संतप्त तरुणांनी पोलीसांवर हल्ला केला. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. जे घडले ते चुकीचे आहे. जे नको व्हायला पाहिजे ते नांदेडमध्ये घडलेले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरु आहे.

- Advertisement -

पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या पद्धतीने नंग्या तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्यात आला ते फारच भयानक आहे. ज्यांनी कोणी अशा प्रकारचे वार पोलिसांवर केले आहेत. त्या सर्वांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. हल्ल्याच्या घटनेमध्ये काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसपींना फोन केला होता. यानंतर आज एसपी, आयजी,जिल्हाअधिक्षक यांची बैठक घेऊन घटनेबाबत अधिक माहिती घेतली. तसेच याबाबत पोलीस प्रशासन चौकशी करत आहे. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.


हेही वाचा: नांदेड पोलीस हल्ला; गुरुद्वारा हिंसाचारात १८ जणांना अटक, ४१० जणांविरोधात गुन्हा दाखल


- Advertisement -

 

- Advertisement -