घरमहाराष्ट्रआधी झळकली पोस्टर, आता राहुल गांधींसह यात्रेत; अशोक चव्हाणांची लेक राजकारणात उतरणार?

आधी झळकली पोस्टर, आता राहुल गांधींसह यात्रेत; अशोक चव्हाणांची लेक राजकारणात उतरणार?

Subscribe

या यात्रेच्यानिमित्ताने लावलेल्या पोस्टरवर त्यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर, त्या आता थेट भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालताना दिसत आहेत. त्यामुळे त्याही लवकरच राजकारणात उतरणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतेय.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज सकाळपासून या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेतील एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीजा चव्हाण असं त्यांचं नाव असून त्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. आधी त्यांचा फोटो पोस्टरवर झळकला होता. आता थेट भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने त्या राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

राजकारणात घराणेशाहीचा इतिहास नवा नाही. अनेक नेते मंडळींनी आपले उत्तराधिकारी राजकारणात उभे केले आहेत. अशातच, अशोक चव्हाण यांच्या कन्याही आता राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत त्या फार परिचित नव्हत्या. कोणत्याच कार्यक्रमात त्यांचा थेट सहभाग नसायचा. मात्र, आता भारत जोडोच्या निमित्ताने त्या प्रसिद्धी झोतात आल्यात आहेत. या यात्रेच्यानिमित्ताने लावलेल्या पोस्टरवर त्यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर, त्या आता थेट भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालताना दिसत आहेत. त्यामुळे त्याही लवकरच राजकारणात उतरणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतेय.

- Advertisement -

शिखांच्या पारंपरिक वेषात राहुल गांधी 

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात पोहोचली आहे. राहुल गांधी काल महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात पोहोचले. जिथे गुरू नानक जयंतीनिमित्त रात्रभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी शिखांच्या पारंपरिक वेषात दिसले.

देगलूरमध्ये उत्साह, गर्दी आणि तिरंगामय वातावरण

- Advertisement -

राहुल गांधी यांच्या “नफरत छोडो भारत जोडो”चा संदेश देणारी ही पदयात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात सोमवारी रात्री दाखल झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षाच्या निशाणीसह फडकणारे तिरंगी झेंडे, तिरंगी पताका आणि तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई, असे देगलूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वातावरण तिरंगामय झाले होते. लहान मुले, महिला, तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला प्रचंड गर्दी झाली होती… पदयात्रेच्या मार्गावर उत्साह ओसंडून वाहत होता… सर्वांच्या नजरा राहुल गांधींकडे लागल्या होत्या… पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -