घरमहाराष्ट्रAshok Chavan: अशोक चव्हाणांबाबत कानावर हात, पण काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात;...

Ashok Chavan: अशोक चव्हाणांबाबत कानावर हात, पण काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, हे मी तुमच्याकडूनच ऐकत आहे. पण लवकरच काँग्रेसचे बडे नेते भाजपात येणार असल्याचा इशारा देत, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, हे मी तुमच्याकडूनच ऐकत आहे. पण लवकरच काँग्रेसचे बडे नेते भाजपात येणार असल्याचा इशारा देत, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. (Ashok Chavan Hand to ear regarding Ashok Chavan but big Congress leaders are in touch with us Devendra Fadnavis indicative statement)

फडणवीस मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते, यावेळी त्यांनी म्हटलं की, अशोक चव्हाण भाजपात येणार हे मी तुमच्याकडूनच ऐकत आहे. परंतु एवढं निश्चित सांगेन की, काँग्रेसमधील अनेक चांगले नेते हे भाजपात येण्याची शक्यता आहे. कारण, जे नेते जनतेशी जोडलेले आहेत, त्यांची तिथे घुसमट होत आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसमधील मोठे नेते भाजपात प्रवेश करतील. आता केवळ एवढंच म्हणेन की, आगे आगे देखो होता है क्या? असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी यापूर्वीच सांगितलं आहे की, काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहे. यांच्यात अनेक अंतर्गत वाद आहेत. तसंच नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची केंद्रीय नेतृत्वात क्षमता नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असेल तर त्याचे कारण काय, हे तपासले पाहिजे. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. हे मी याठिकाणी पुन्हा सांगतो.

(हेही वाचा: Ashok Chavan : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का! अशोक चव्हाणांच्या ‘हाता’त कमळ? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -