घरमहाराष्ट्रAshok Chavan : आता अशोक चव्हाणांची बारी, काँग्रेस सोडण्याची केली तयारी

Ashok Chavan : आता अशोक चव्हाणांची बारी, काँग्रेस सोडण्याची केली तयारी

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चव्हाणांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चव्हाणांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये ‘विधानसभा सदस्य’ या शब्दाआधी पेनाने ‘माजी’ असे लिहिण्यात आले आहे. 11.24 आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात मोठे खिंडार पडणार असल्याचेही बोलले जात आहे. कारण अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे 10 ते 12 आमदारही काँग्रेसची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला राजीनामा देत अशोक चव्हाण हे भाजपावासी होणार असल्याचेही बोलले जात आहे. (Ashok Chavan has resigned from the membership of the Congress party)

हेही वाचा… Ashok Chavan: अशोक चव्हाणांबाबत कानावर हात, पण काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात; फडणवीसांचं सूचक वक्तव्य

- Advertisement -

अशोक चव्हाण यांनी आज (ता. 12 फेब्रुवारी) सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. पण आता अशोक चव्हाण यांच्या नावाचे लेटरहेड समोर आल्याने या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु, यामुळे काँग्रेसला मोठा खिंडार पडले आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे आता काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. नाना पटोले हे रायपुरहून दिल्लीला जाणार आहेत. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत भाजपात जाणाऱ्या काही नेत्यांमुळे राज्यात किती फरक पडणार, राजकीय स्थिती काय असेल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त विश्वजीत कदम, जितेश अंतापूरकर, अस्लम शेख, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमिन पटेल या मातब्बर आमदारांशिवाय काँग्रेसमधील काही महत्त्वाचे नेतेही काँग्रेसची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षभरापासून अशोक चव्हाण काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे कमळ हातात घेणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, त्यांना आता भाजपामध्ये जाण्याचा पूर्ण निर्णय घेतला आहे. तर त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची संधीही देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज सकाळी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांचा फोन नॉ रिचेबल आला. परंतु, आता थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाणांची राजकीय कारकिर्द…

1985 साली अशोक चव्हाण यांनी राजकारणात प्रवेश केला. 1986-1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. मात्र 1987 ते 1989 दरम्यान संसदीय राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पक्ष कार्यातही भाग घेण्यास सुरुवात केला. 1987 मध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले आणि ते थेट खासदार झाले. त्यावेळी भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून ते संसदेत पोहोचले होते. 1992 मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आले. 1993 ला त्यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास तसेच गृहराज्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर 1999 ला मुदखेड मतदार संघातूंन निवडून येत विलासरावांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून अशोकरावांनी कारभार सांभाळला आणि 2004च्या निवडणुकीत पुन्हा बाजी मारत विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ते उद्योग आणि सांस्कृतिक खात्याचे कॅबिनेटमंत्री झाले.

अशोक चव्हाण यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 रोजी मुंबईत झाला. त्यांनी बीएसस्सी आणि एमबीए या दोन पदव्या घेतल्या आहेत. शंकरराव चव्हाणांचा राजकीय वारसा त्यांच्या दोन शिष्यांना मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. एक म्हणजे विलासराव देशमुख आणि दुसरे म्हणजे चव्हाण यांचे चिरंजीव अशोक चव्हाण. चव्हाणांचे हे दोन्ही शिष्य पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाले. वडिलांनंतर अशोक चव्हाणही राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री बनणारी पिता-पुत्रांची ही पहिलीच जोडी आहे. 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. देशमुख गेल्यामुळे मराठवाड्यातूनच मुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्याने चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -