मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, अशोक चव्हाणांचा खुलासा

Ashok Chavan

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच ही भेट कशासंदर्भात होती, याबाबत देखील चव्हाणांनी खुलासा केला आहे. मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. तसेच आमच्यात विविध विषयांवर चर्चा झाली, असं अशोक चव्हाण म्हणाले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. फडणवीस आणि चव्हाण यांच्यात १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयाची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस-चव्हाणांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, आमच्यात विविध विषयांवर गप्पा झाल्या, मात्र राजकीय चर्चा झाल्या नाहीत, असं अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मानले जाणारे आशिष कुलकर्णी आता मुख्यमंत्री कार्यालयात रुजू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समन्वयाची जबाबदारी कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या भेटीमागचं कारण काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : प्रत्यक्ष कर संकलनात ३३ टक्क्यांनी वाढ, उद्दीष्ट्यपूर्ती होणार