मराठा समन्वयकांच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, विभागनिहाय बैठका घेणं गरजेचं

राज्याचे मंत्रीमंडळ आणि मराठा समन्वयकाची बैठक आज पार पडत असून मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली जात आहे. मराठा समन्वयकांसोबतची बैठक पार पडल्यानंतर काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विभागनिहाय बैठका घेणं जास्त महत्त्वाचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

झालेल्या निर्णयानुसार काही विभाग हे गृहविभागाच्या संबंधित आहेत. काही नियोजन विभागाच्या संबंधित आहेत. काही कोर्ट आणि न्यायालयीन प्रकरणं आहेत. काही सामान्य प्रशासन विभाग असे आहेत. अनेक विभागांचे विषय आहेत जे शासन स्थरावर निर्णय झालेत. त्याची अंमलबजावणी आणि चर्चेला आम्ही सुरूवात केली आहे. विभागनिहाय बैठका घेणं हे जास्त उचीत होईल. कारण एकत्र बैठका घेणं हे सध्यातरी शक्य नाहीये. संबंधित विभागाचे मंत्री आणि त्यांचे सचिव तसेच समाजाचे प्रतिनिधी यांची बैठक आम्ही ठरवली आहे.

विभागनीय बैठका झाल्या तर ते जास्त योग्य राहील, असं माझं मत आहे. कारण संबंधित विभागाचे मंत्री, सचिव आणि प्रतिनिधी असल्याशिवाय त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होऊ शकत नाही, असं चव्हाण म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यातच आज मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली आहे. परंतु काही अन्य काम असल्यामुळे आपण बैठकीतून लवकर बाहेर आलो आहोत, असं अशोक चव्हाण म्हणाले.


हेही वाचा : आपल्यावरील हल्ल्यांची सीबीआय मार्फत चौकशी करा, किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात याचिका