घरताज्या घडामोडीविधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी, अशोक चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

विधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला दिल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी, अशोक चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दोन्ही गटातील एकूण १८ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची निवड शिवसेनेतून करण्यात आली आहे. विधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळायला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

मंत्रिमंडळात एकाही महिला स्थान देण्यात आलेलं नाहीये. यावरून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यावर देखील महिलांना संधी न दिल्याच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ कुणाचंही असो, महिलांना सक्षम करणं आणि प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यातील सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली होती. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची वर्णी लावण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवले होते.

- Advertisement -

हेही वाचा : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, पृथ्वीराज चव्हाणांची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -