घरताज्या घडामोडीकाँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधात लढा भविष्यात नेटाने लढला जाईल, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधात लढा भविष्यात नेटाने लढला जाईल, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये केंद्रातील भाजपविरोधात सक्षम आघाडी निर्माण करण्याबाबत चर्चा झाली. तसेच काँग्रेसविरहीत ही आघाडी असेल का? याबाबत नेत्यांमध्ये दुमत आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मैदानात उतरुन लढल्यास सोबत घेऊ असे म्हणत टोला लगावला आहे. यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढू असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

- Advertisement -

विरोधकांना बळ देऊ नये

देशात मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही असेही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे – नाना पटोले


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -