घरताज्या घडामोडीमी काँग्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या पक्षाबाबत बोलावं, साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

मी काँग्रेसमध्ये, त्यांनी त्यांच्या पक्षाबाबत बोलावं, साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

Subscribe

मी काँग्रेसमध्ये आणि सुभाष साबणे शिवसनेत आहेत. मग आमचा संबंध काय? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना नेते सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना साबणे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीमुळे शिवसेना सोडत असल्याचा आरोप सुभाष साबणे यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी साबणेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं असून साबणेंनी त्यांच्या पक्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. मी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे माझा काही संबंध नसल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण शिवसेना संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप सुभाष साबणे यांनी केला आहे. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना देगलूर बिलोली पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्याचे बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सुभाष साबणे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, माझा आणि सुभाष साबणे यांचा संबंध काय? साबणेंनी त्यांच्या पक्षाबाबत भूमिका स्पष्ट करावी. मी काँग्रेसमध्ये आणि सुभाष साबणे शिवसनेत आहेत. मग आमचा संबंध काय? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. पक्षातून जाणारा काहीतरी बोलून जातो त्यामुळे साबणे यांनी आपल्या पक्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सुभाष साबणेंचा आरोप काय?

शिवसेना नेते सुभाष साबणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. साबणे यांनी म्हटलं आहे की, मी १९८४ पासून शिवसेनेत काम केलं आहे. गेल्या ६ निवडणुका शिवसेनेच्या नावावर निवडून आलो आहे. शिवसेनेमध्ये इतके वर्ष काढले आहेत. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीमुळे शिवसेना सोडावी लागली. शिवसेना सोडावी लागत असल्यामुळे अतिशय वाईट वाटत असल्याचे सांगताना साबणे यांना अश्रू अनावर झाले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण नांदेडमध्ये शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडी करण्यात तरबेज लोकं आहेत. यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे माझ्यासारखेच अनेक लोकांना वाटत आहे की, शिवसेनेने महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं. आताच्या निवडणुकीत काँग्रेस नाहीतर राष्ट्रवादीला मतदान करा असे म्हणायचे आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान द्या असे म्हणाये? असा प्रश्न साबणे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसेना सोडली, सुभाष साबणेंचा आरोप


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -