घरताज्या घडामोडीदोघांमधील फरक स्पष्ट, हेतूही स्पष्ट, अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांचा...

दोघांमधील फरक स्पष्ट, हेतूही स्पष्ट, अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांचा भाजपला इशारा

Subscribe

मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने केलेला कायदा रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा सामाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरमध्ये मराठा समाजाने धरणे आंदोलन केले या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका बाजूला ठेवून मराठा समाज आंदोलकांना पाठिंबा देत सहभागी झाले होते. यावरुन काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानी भाजपवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावरील दोघांमधील फरक स्पष्ट, हेतूही स्पष्ट आहे. अजूनही वेळ गेलेली नाही असा इशारा भाजपला अशोक चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत आणि ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चांचे इशारे देत आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे. आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ? असा सवालही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांचा आंदोलनात सहभाग

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी जिथे जिथे मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन होईल त्या आंदोलनात भाजप कार्यकर्ता अशी ओळख न दाखवता त्या आंदोलनात सहभागी होईल. प्रत्येक विषयात कोल्हापुर जसा पुढाकार घेते, टोलच्या बाबतीत, वाढीव वीज बिलाच्या बाबतीत कोल्हापुराने जसा पुढाकार घेतला होता तसेच आता तालमी, सर्व संघटना आणि समाजाने पुढाक घेतला आहे. त्यांचे आज लाक्षणिक उपोषण असून त्या उपोषणाला एक नागरिक म्हणुन पाठिंबा द्यायला आलो आहे.

- Advertisement -

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जो पर्यंत २ वर्षापर्यंत कायदा असताना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यांना नियुक्ती पत्र द्या, ४ तारखेच्या आधी जर तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल केली नाही तर राज्य सरकारला करताच येणार नाही. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, मागास आयोग गेले दीड वर्ष महाराष्ट्रात नाही आहे. याची कशाला वाट बघत आहात. राज्याला मागास आयोग लागतो याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही. मागास आयोगाची स्थापना करा. मेडिकल फिल्डच्या सिटा तुम्ही विकत घ्या आणि मराठा समाजाला त्यामध्ये प्रवेश द्या अशीही मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -