घरताज्या घडामोडीभाजपमधील अस्वस्थ नेत्यांच्या घरवापसीबाबत निर्णय घ्यावा, अशोक चव्हाण यांचे नाना पटोलेंना आवाहन

भाजपमधील अस्वस्थ नेत्यांच्या घरवापसीबाबत निर्णय घ्यावा, अशोक चव्हाण यांचे नाना पटोलेंना आवाहन

Subscribe

काँग्रेस नेते नाईलाजास्तव भाजपात गेले. पण ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मन तिकडे रमत नाही.

सुनील देशमुख यांनी भाजपला रामराम करुन काँग्रेसध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमधील नाराज नेत्यांच्या घरवापसीबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केलं आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या घरवापसीबाबत निर्णय घेतला पाहिजे. राज्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा वाढवण्यासाठी या नेत्यांना कामाला लावले पाहिजे असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी सुनील देशमुख यांच्या घरवापसीचे स्वागत केलं आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला वाढवण्याबाबत भूमिका व्यक्त केली आहेत. तसेच जे काँग्रेसला सोडून भाजपला गेले आहेत. त्या नेत्यांमध्ये काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक नेत्यांना पक्षाला सोडून जायचे नव्हते परंतु नाईलाजामुळे या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु या नेत्यांच्या घरवापसीसाठी पुन्हा निर्णय घेतला पाहिजे. या नेत्यांना पक्ष वाढवण्यासाठी आणि उभारणीसाठी कामाला लावले पाहिजे असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

दम्यान अशोक चव्हाण यांनी सुनील देशमुख यांच्या घरवापसीचे स्वागत केले आहे. तसेच मध्यंतरी अनेक काँग्रेस नेते नाईलाजास्तव भाजपात गेले. पण ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मन तिकडे रमत नाही. त्यामुळे त्यांच्या घरवापसीबाबत तातडीने निर्णय घेऊन त्यांना पुन्हा जोमाने काँग्रेस उभारणीच्या कामाला लावले पाहिजे. असं ट्विट अशोकच चव्हाण यांनी केल आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपमधील अस्वस्थ नेत्यांच्या घरवापसीच्याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन केलं आहे.

- Advertisement -

देशमुखांनी विदर्भात जोमानं काम करावं

सुनील देशमुख यांनी १२ वर्षानंतर काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. देशमुख यांनी विदर्भात आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम केलं पाहिजे. ते कुठेही गेले तरी त्यांचे मन मात्र काँग्रेसमध्ये होते. त्यांचे काम पाहिलं आहे. भाजपमधल्या अस्वस्थ नेत्यांचे मन रमत नाही आहे. त्यामुळे या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

२०२४ मध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला पाहिजे

सुनील देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसचा हात सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. पुन्हा ते नेते घरवापसी करत आहेत. २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल तसेच राज्यात २०२४ मध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -