अशोक चव्हाण, वडेट्टीवारांच्या अनुपस्थितीचे कारण काय?

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक आमदार अनुपस्थितीत होते. ते दोघेही 11 वाजता विधान सभेचे दरवाजे बंद झाल्यानंतर विधीमंडळात पोहोचले.

ashok chavan

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक आमदार अनुपस्थितीत होते. ते दोघेही 11 वाजता विधान सभेचे दरवाजे बंद झाल्यानंतर विधीमंडळात पोहोचले. दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वेळेत न पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे हे वेळेवर पोहोचले नाहीत. यापूर्वी वारोवार काँग्रेसचा एक गट फुटून भाजप सोबत जाईल अशी चर्चा होती. आजच्या अनुपस्थितीमुळे त्याबाबत कुजबुज आहे ती खरी वाटण्याची शक्यता आहे. दरम्यान आज बहुमत चाचणीवेळी एकून 20 आमदार अनुपस्थित होते.

काँग्रेसचे अनुपस्थित आमदार  –

1.     अशोक चव्हाण, काँग्रेस

2.     विजय वडेट्टीवार, काँग्रेस

3.     प्रणिती शिंदे, काँग्रेस

4.     झीशन सिद्दिकी, काँग्रेस

5.     धीरज देशमुख, काँग्रेस

6.     अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी

7.     संग्राम जगताप, राष्ट्रवादी

8.     जितेश अंतापुरकर, काँग्रेस

9.     कुणाल पाटील, काँग्रेस

10.मुक्ता टिळक, भाजप (आजारी)

11.लक्ष्मण जगताप, भाजप (आजारी)

12.नवाब मलिक, राष्ट्रवादी (जेलमध्ये)

13.अनिल देशमुख, राष्ट्रवादी (जेलमध्ये)

14.मुफ्ती इस्माईल, एमआयएम

15.निलेश लंके, राष्ट्रवादी

16.दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

17.दिलीप मोहिते, राष्ट्रवादी

18.राजू आवळे, काँग्रेस

19.मोहन हंबर्डे, काँग्रेस

20.शिरीष चौधरी, काँग्रेस

तटस्थ आमदार –

1.     रईस शेख, सपा.

2.     अबू आझमी, सपा.

3.     शाह फकुर अन्वर, एमआयएम.

  • निधन – रमेश लटके, शिवसेना
  • पीठासीन अधिकारी –राहुल नार्वेकर, भाजप

हेही वाचा – ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामिल

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवेळी राष्ट्रवादीचे सर्वाधीक आमदार अनुपस्थित –

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सहजपणे जिंकून एकनाथ शिंदे सरकारने सहज विजय नोंदविला होता. भाजपाचे पाठबळ या एकनाथ शिंदे यांना असल्याने या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. मात्र, या प्रक्रियेत 12 आमदार अनुपस्थित होते आणि त्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त होती.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीवेळी राष्ट्रवादीते सात आमदार या निवडणूक प्रक्रियेच्यावेळी अनुपस्थित होते. त्यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख कारागृहात आहेत, तर निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे आणि अण्णा बनसोडे हे अनुपस्थित होते. तर, आजारपणामुळे भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघे या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आणि जितेश अंतापूरकर तसेच एमआयएमचे मुफ्ती इस्माइल शाह हे अनुपस्थित होते. तसेच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदान केले नाही.

हेही वाचा – राहुल नार्वेकर 20वे विधानसभा अध्यक्ष