नांदेड : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी मिळाल्यावर प्रचारा सुरुवात केली आहे. मात्र 10 दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्यानंतर त्या एका गावात पोहचल्या. यावेळी मराठा बांधवांनाकडून प्रणिती शिंदे यांची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्नही काही जणांनी केला. ही घटना ताजी असतानाच नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथे गेले असता गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. यावेळी गावकऱ्यांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांना माघारी परतावे लागेल. मात्र गाड्या परतल्यानंतर त्यांच्या ताफ्यावर काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. (Ashok Chavans fleet was blocked by the villagers Attempts were also made to throw stones by the youth)
हेही वाचा – Ashish Shelar : संजय राऊत राजकारणातले गणपत पाटील; मोदींवरील टीकेला शेलारांचे प्रत्युत्तर
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या हाताची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्य पद दिले आहे. सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली असल्यामुळे अशोक चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे आज गेले होते. मात्र त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात येताच अशोक चव्हाणांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. यावेळी अशोक चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला.
पोलिसांकडून जमा पांगविण्याचा प्रयत्न झाला. मात्र गावकऱ्यांचा वाढता रोष पाहून अशोक चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजासह इतर समाजाच्या तरुणांनी अशोक चव्हाण यांचा ताफा अडवल्याची माहिती मिळत आहे. तसेच पोलिसांच्याच गाडीमध्ये अशोक चव्हाण यांना बाहेर काढण्यात आल्याचेही समजते. यानंतर अशोक चव्हाण यांचा ताफा परत नांदेडच्या दिशेने निघाला.
हेही वाचा – Modi VS Raut : मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन; पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राऊतांची टीका
दरम्यान, काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदे या 21 मार्च रोजी पंढरपूर दौऱ्यावर होत्या. पंढरपूर तालुक्यातील एका गावात ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा करत असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा बांधवाकडून जबरदस्त घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही जणांकडून वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र प्रणिती शिंदे यांनी वाहनाबाहेर येत गाडीला हात लावायचा नाही, अशा शब्दात सुनावले. तसेच त्यांनी गाडीबाहेर उभे राहत मराठ आंदोलकांच्या घोषणााजी ऐकल्या. यावेळी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मराठा बांधवाना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रणिती शिंदे गो बॅकचे नारे देत पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना माघारी फिरावे लागले.