Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Lok Sabha Election 2024 : ...म्हणून महाविकास आघाडी गरजेची, अशोक चव्हाणांची महत्त्वाची...

Lok Sabha Election 2024 : …म्हणून महाविकास आघाडी गरजेची, अशोक चव्हाणांची महत्त्वाची टिप्पणी

Subscribe

निवडणुकांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी असणे गरजेचे आहे, अशी महत्त्वाची टिप्पणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा, लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण महाविकास आघाडी असो किंवा शिंदे-फडणवीस सरकार असो यांच्यामध्ये अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे या कारणामुळे यांच्यामध्ये धूसफुस सुरु असल्याचे बोलले जात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या जागा वाटपाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी असणे गरजेचे आहे, अशी महत्त्वाची टिप्पणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य; नाना पटोलेंचे वक्तव्य

- Advertisement -

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, दोन दिवसांच्या चर्चेनंतर जागेविषयीचा निर्णय घेतला जाईल. कोणत्या पक्षाने, विशेषतः काँग्रेसने कोणत्या जागेवर दावा केला पाहिजे? हे ठरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहिली पाहिजे. म्हणजेच मतांचं विभाजन टाळता येईल. ओपिनिअन पोल यायला सुरुवात झाली आहे. अर्थात परिस्थितीनुसार पोल बदलत जातात. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर तिन्ही पक्षांनी एकत्र राहून निवडणुका लढवल्या तर क्षमता असलेल्या पक्षाला जागा दिल्या गेल्या पाहिजे असा सर्वसाधारण कल आहे. आकडा किती होईल, काय होईल हे सांगता येत नाही.

तर, “आपापल्या जागावाटपांसंदर्भात भूमिका मांडावी, जेणेकरून जागेची निश्चिती करता येईल. त्याअनुषंगाने काँग्रेसने जागेसंदर्भात असा निर्णय घेतला आहे किमान त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. देशात झपाट्याने राजकीय परिस्थिती बदलत आहे. विद्यमान मोदी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. त्याला बळ देण्याचं काम कर्नाटकच्या निकालाने केलं आहे. आज आणि उद्या दोन दिवस एकंदरीत राज्यातील राजकीय परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे, त्या त्या मतदारसंघातील लोकांचं काय म्हणणं आहे, कोणत्या मुद्द्यासंदर्भात विषय आहे, जनरल फिडबॅक घेण्याचं काम सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, धुळे, नंदूरबार या चार मतदारसंघातील चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे,” असे यावेळी अशोक चव्हाण यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

दोन दिवसांच्या बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन काय चित्र आहे ते समोर येतंय हळूहळू. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा कार्यकर्ते, नेत्यांच्या माध्यमांतून दोन दिवस आढावा घेतला जाणार आहे. निवडणुका लढल्या जातात. बऱ्याचवेळा देशपातळीवरील विषय असतात. अनेकदा लोकल पातळीवर विषय असतात. लोकल फॉर व्होकल हा विषय आपण कर्नाटकात अनुभवला. लोकल विषयांवर प्रभावीपणे प्रचार केल्यानंतर, लोकांच्या मनातील सरकार कसं असलं पाहिजे, त्यांना भेडसावणारे प्रश्न काय आहेत यासंदर्भात प्रचार व्हावा अशी लोकांची इच्छा असते. राष्ट्रीय विषयांवर बोललेच पाहिजे. पण स्थानिक विषयांकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या मतदारसंघात काय म्हणणं आहे, काय केलं पाहिजे, यावर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या राजधानीत येणारे विषय, स्थानिक पातळीवरचे विषय यात तफावत असू शकते. त्यामुळे हा विषय सुद्धा चर्चेत आहेत की कोणते विषय घ्यायचे आहेत, असे बैठकीत चर्चा झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

त्यामुळे आता पुण्याच्या जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये लवकरच चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यास मते नक्कीच फुटू शकतात, असेही अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -