घरमहाराष्ट्रसिडको अध्यक्षपदासाठी अशोक गावडे यांच्या नावाची चर्चा

सिडको अध्यक्षपदासाठी अशोक गावडे यांच्या नावाची चर्चा

Subscribe

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा, गावडे यांच्या नावामुळे अध्यक्षपदाची वाढली चुरस

सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सिडको अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर अशोक गावडे यांचे नाव चर्चेत आल्याने अध्यक्षपदाची चुरस वाढली आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना असे त्रिशंकू सरकार आहे. त्यामुळे या तिन्हीही सत्ता घटकातील नेते मंडळी सिडको अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावून आहेत. असे असले तरी सिडको अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडको अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुखमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील नेत्यालाच आतापर्यंत सिडको अध्यक्षपद मिळाले असल्याचा इतिहास आहे. यामध्ये साधारणतः स्थानिक भूमिपुत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा स्थानिकांचा विचार केला जाईल या भूमिकेतून राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत हे देखील इच्छुक असायची चर्चा आहे. मात्र, हि परंपरा खंडित करून पक्षासाठी निष्ठेने काम करणार्‍या नेत्याला प्राधान्य देण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे. यातूनच अशोक गावडे यांचे नाव पुढे आले आहे.

- Advertisement -

अशोक गावडे हे मागील ४० वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत सक्रिय आहेत. राष्ट्रवादीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव पक्षात आहे. आमदार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर नवी मुंबईत पक्षाला सावरण्याचे , उभारी देण्याचे काम अशोक गावडे यांनी केले आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक , नवी मुंबईचे उपमहापौर अशा विविध महत्वपूर्ण पदांची जबाबदारी अशोक गावडे यांनी सांभाळली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -