घरताज्या घडामोडीRamesh Deo Death: ते मला माझ्या मोठ्या भावासारखे, रमेश देव यांच्या निधनानंतर...

Ramesh Deo Death: ते मला माझ्या मोठ्या भावासारखे, रमेश देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ भावूक

Subscribe

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी दिली. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. तसेच मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

याबद्दल मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दुख:द भावना व्यक्त केल्या आहेत. ही सर्वात मोठी दुख:द बातमी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीतला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट आपल्यातून गेलाय. अतिशय उत्तम नट आणि चांगले माणूस होते. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. तसेच ते मला माझ्या मोठ्या भावासारखे होते. ते नेहमी मला धाकट्या भावासारखे मानायचे. चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर मी त्यांच्यामुळे उभा राहिलो. त्यामुळे ही माझ्यासाठी मोठी आठवण आहे. तसेच त्यांच्यासोबत मी बरेच चित्रपट केले. ३० जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असताना माझं त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं, अशी आठवणही अशोक सराफ यांनी सांगितली आहे.

- Advertisement -

रूपाली चाकणकर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झाले. ही अत्यंत दुःखदायक बातमी आहे. रमेश देव यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या, असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

प्रख्यात अभिनेते,निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. सुमारे २८५ चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. याशिवाय रंगभूमीवरही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

मराठीतील सुप्रसिद्ध व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना विनम्र श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय आहेत. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो. माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दुःख झाले. गेली अनेक दशकं त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांचासारखा नट पुन्हा होणार नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

स्वत:मधला ताजेपणा शिकवणारे म्हणजे रमेश काका – सोनाली कुलकर्णी

मला अतिशय वाईट वाटतंय. कारण सर्वांना स्फुर्ती, ऊर्जा आणि स्वत:मधला ताजेपणा शिकवणारे म्हणजे रमेश काका आहेत. माझ्यासाठी ते कायम माझ्या मनात असणार आहेत. मी रमेश काकांसोबत वासुदेव बळवंत फडके नावाचा सिनेमा केला होता. तेव्हा ते निर्माता होते. एका कलाकार म्हणून सांस्कृतिक क्षेत्रासाठी खूप वाईट बातमी आहे, अशी दुख:द भावना मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

मी त्यांच्यासोबत दोन चित्रपट केले – शरद पोंक्षे

आमच्या कलेच्या त्यांच्या पिढीमध्ये आणि वयामध्ये खूप अंतर होतं. पण ते अंतर काम करताना कधीही जाणवू दिलं नाही. मी त्यांच्यासोबत दोन चित्रपट केले. एखाद्या मित्रासारखा त्यांचा स्वभाव होता. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी खूप छान होती, अशी दुख:द भावना मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा : Ramesh Deo Death | ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांचे निधन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -