Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दुकानदार, हॉटेल चालकांना दिलासा देण्याबाबत सरकार सकारात्मक, अस्लम शेख यांची माहिती

दुकानदार, हॉटेल चालकांना दिलासा देण्याबाबत सरकार सकारात्मक, अस्लम शेख यांची माहिती

लसीच्या पुरवठ्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी पाठपुरावा करावा

Related Story

- Advertisement -

राज्यातील आणि मुंबईतील दुकानदार, हॉटेल चालक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा देण्याबाबत विचार सुरु असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केल्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत खुली ठेव्याची परवानगी दिली आहे. परंतु व्यापाऱ्यांना ही वेळ मान्य नसल्यामुळे दुकाने बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध केला आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देणार असल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकार यावर विचार करत आहे. तसेच केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबई आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया राबवता येणार नाही असेही पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्याला केंद्राकडून वेळेवर लस उपलब्ध होत नाही मात्र खासगी रुग्णालयांना कोरोना लसीचा साठा मिळतो आहे. सरकारी रुग्णालयांना लस मिळत नाही. कोरोना काळात तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही अस्लम शेख यांनी केला आहे.

लसीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी पाठपुरावा करावा

- Advertisement -

राज्यात लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी पाठपुरावा करावा, राज्याचा जीएसटीचा पैसा थकीत आहे त्यासाठी प्रयत्न करावा असा टोला अस्लम शेख यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत अल्यापासून भाजप सरकार पडण्यासाठी तारीख पे तारीख देणं सुरु आहे. भाजप केवळ आपले आमदार, कार्यकर्ते कसे वाचून राहतील याचा प्रयत्न सुरु असल्याचा टोला पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

लोकलबाबत अद्याप निर्णय नाही

राज्यमंत्रि मंडळाच्या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन आणि मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. परंतु राज्य मंत्रिमंडळात कोणताही निर्णय झाला नाही. मुंबईतील व्यापाऱ्यांबाबतही कोणता निर्णय घेण्यात आला नाही. परंतु राज्य सरकार व्यापाऱ्यांना सवलती देण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

- Advertisement -