बंडखोर आमदार मुंबईत येईपर्यंत आम्ही काय बोलणार? – पालकमंत्री अस्लम शेख

aslam sheikh

कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. बंडखोर आमदार मुंबईत येईपर्यंत आम्ही काय बोलणार?, असा सवाल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे. अस्लम शेख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी बंडखोर आमदारांबाबत भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तसेच प्रसार माध्यमं आणि ई-मेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार जे शिवसेनेसोबत आहेत. त्यांना बोलायची काय गरज आहे. त्या बंडखोर नेत्यांची भाषणं देखील तुम्ही चॅनेलवर चालवली आहेत. परंतु जे आमदार मुंबईत येत नाहीत, त्यावर आम्ही काय बोलणार?, असं अस्लम शेख म्हणाले.

राजकीय चर्चा ही गुवाहाटी येथे सुरू आहे. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत शेती, पीकं, पाणी, कोविड आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. तसेच अद्यापही त्यावर चर्चा सुरू आहे. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात वाढत आहे. तर हे नक्की कोणत्या जिल्ह्यात वाढत आहेत. तर कोणत्या जिल्ह्यात काय बदल करण्यात आलेत का? तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी काही आदेश दिले आहेत का, अशा प्रकारच्या वाढत्या कोरोनाबाबत चर्चा करण्यात आली आहे.

राज्यात पाऊस कमी पडत असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत १० टक्के पाणीसाठा कपात झाला आहे. तर काही राज्यांत पावसाने हजेरी लावली आहे. शेती आणि मुख्यत्वे कोरोना विषाणूच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली आहे, असं अस्लम शेख म्हणाले.


हेही वाचा : औरंगाबादचं नामांतर करावं अशी मागणी – अनिल परब