घरमहाराष्ट्रइस्पॅलियर शाळेला जागतिक पुरस्कार, २२०० शाळांमध्ये ठरली अव्वल

इस्पॅलियर शाळेला जागतिक पुरस्कार, २२०० शाळांमध्ये ठरली अव्वल

Subscribe

नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्याबी अ लाईफ सेव्हर ऑफ युअर फँमिली' याप्रकल्पाची तब्बल २२०० शाळांमधून पहिल्या पाचमध्ये निवड झाली आहे.

सकारात्मकता आणि प्रबोधनयाद्वारे समाजात परिवर्तन करण्यात योगदान देणाऱ्या नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलच्या विद्याबी अ लाईफ सेव्हर ऑफ युअर फँमिली’ याप्रकल्पाची तब्बल २२०० शाळांमधून पहिल्या पाचमध्ये निवड झाली आहे. डिझाईन फॉर चेंज (डीएफसी) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने घेतलेल्या या स्पर्धेत इस्पँलियरच्या विद्यार्थ्यांना लाँग लिस्टिंग या श्रेणीत हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहमदाबाद येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात स्कूलच्या मुख्याध्यापिका अंकिता कुरिया, विश्वस्त डॉ. प्राजक्ता जोशी यांच्यासह इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना हा पुरस्कार स्वीकारला.

८ हजार हून अधिक मुलांना शिक्षक

डीएफसी या संस्थेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेतली जाते. समाजात परिवर्तन घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याची संधी असते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत जागतिक स्तरावरील २२०० शाळांनी आपले प्रकल्प (स्टोरी) पाठविले होते. यात इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला लाईफ सेव्हर ऑफ युअर फँमिली हा प्रकल्प सादर केला. घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ काय केले पाहिजे, सीपीआरचे महत्व या विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांना डॉ. महेंद्र महाजन व डॉ. नेहेते यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी शहरातील इतर शाळांतील सुमारे ८ ते ९ हजार विद्यार्थ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण दिले. तसेच हदयविकाराचा प्रसंग उदभवल्यास घाबरून न जाता तात्काळ कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. बी अ लाईफ सेव्हर या प्रकल्पाने परिवर्तन घडवण्यात मोलाचे योगदान दिल्याने या स्टोरीची निवड जागतिक स्तरावर करण्यात आली आहे. लाँग लिस्टिंग श्रेणीत या प्रकल्पाची निवड झाली असून विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक असे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणतज्ञ किरण सेठी, गीत सेठी, पीके व थ्री इडियट या चित्रपटांचे सहलेखक अभिजात जोशी, अभिनेते राहुल बोस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्कूलचे प्रमुख सचिन जोशी यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. डिझाईन फॉर चेंज या संस्थेच्या स्पर्धेत निवड झालेल्या बी अ लाईफ सेव्हर ऑफ युअर फँमिली अर्थात सीपीआर या प्रकल्पाची माहिती व सादरीकरण राष्ट्रपती भवनात करण्याची संधी नाशिकच्या या विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -