घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपांडवलेणी पायथ्याशी कंपनी मॅनेजरची हत्या; घटनास्थळापासून जवळच संजय राऊत होते वास्तव्याला

पांडवलेणी पायथ्याशी कंपनी मॅनेजरची हत्या; घटनास्थळापासून जवळच संजय राऊत होते वास्तव्याला

Subscribe

नाशिक : शहरातील पांडवलेणीच्या पायथ्याशी कंपनी मॅनेजर वर प्राण घातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना झाली त्याच्या काही अंतरावर खासदार संजय राऊत हे एका हॉटेल मध्ये थांबले आहे.

पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगण जवळ एका कंपनीत मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले होते. त्यांनतर त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,मात्र या हल्ल्यात मॅनेजर योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला आहे. योगेश मोगरे हे आपले काम उरकल्यानंतर गरवारे येथील सर्विस रोड वरून पाथर्डी फाट्याकडे एमएच १५ एच.वाय ४९५९ क्रमांकाच्या चारचाकी कारने जात होते. यावेळी हॉटेल आंगण समोर अज्ञात दोन गुंडांनी त्यांची गाडी अडवून थांबवले आणि त्यांनी धारदार कोयते हत्यारे काढून मोगरे यांच्या अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले. योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना एका रिक्षा चालकाने त्यांना पाथर्डी फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे, यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पहाणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -
जवळच संजय राऊतांचा मुक्काम 

खासदार संजय राऊत यांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी याआधीच म्हंटले होते. याच तसेच काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावेळी दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र, पंडावलेणीच्या पायथ्याशी घडलेल्या खुनाच्या घटने पासून अगदी हाकेच्या अंतरावर संजय राऊत एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. अशा वेळी त्या हॉटेल व आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट असणे अपेक्षित होते. परंतु, इतक्या जवळ इतकी भीषण हत्येची घटना तीही भर रस्त्यात होते यावरून नाशिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -