Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लोकलमध्ये तरुणीवर प्राणघातक हल्ला

लोकलमध्ये तरुणीवर प्राणघातक हल्ला

फरार आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीची पडताळणी सुरू

Related Story

- Advertisement -

वसई रेल्वे स्थानकातून लोकल प्रवास करताना तरुणीवर डब्यातच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. लुटमारीच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. तरुणीला रक्तबंबाळ अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. फरार आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीची पडताळणी करत आहेत.

वसईमध्ये राहणारी तरुणी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी वसई स्थानकात आली. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास तिने वसई स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून अंधेरीला जाणारी स्लो लोकल पकडली. ट्रेन सुरू होताच एक इसम तिच्या डब्यात चढला आणि त्याने तरूणीकडील मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीने प्रतिकार करताच आरोपीने तिच्या डोक्यावर आणि चेहर्‍यावर एका वस्तूने प्राणघातक हल्ला करून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढली. तुटलेल्या साखळीचा काही भाग उचलून तो नायगाव स्थानकावर उडी मारून पसार झाला.

- Advertisement -

जखमी अवस्थेत ती तरुणी नायगाव स्थानकात उतरली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबियांनी या प्रकाराबद्दल वसई रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

- Advertisement -