लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट आली होती. मात्र, विधानसभेला ही लाट ओरल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या काही कलांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. महायुतीनं तब्बल 200 चा आकडा पार केला आहे. तर, महाविकास आघाडीला 100 चा आकडाही पार करताना नाकीनऊ येताना दिसत आहेत. यातच काँग्रेसचे बडे नेत्यांना बड्या धक्का बसला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, लातूरमधील अमित देशमुख आणि धीरज देशमुख, विश्वजित कदम, रवींद्र धंगेकर, ऋतुराज पाटील, असे नेते पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : पुण्यात फक्त दोन ठिकाणी ‘मविआ’ आघाडीवर, जिल्ह्यात महायुतीचं वारे
मुळात महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये होते. मात्र, थोरात हे किमान 11 हजारांच्या आसपास पिछाडीवर आहेत. लातूरमधील देशमुख बंधूंना सुद्धा भाजपच्या उमेदवारांनी जेरीस आणल्याचं दिसत आहे. विश्वजित कदम यांच्यासारख्या मोठ्या नेत्यालाही पिछाडीवर राहावं लागत आहे.
महायुती पुढे, महाविकास आघाडी पिछाडीवर…
पहिल्या काही कलांनुसार, राज्यात महायुतीनं 216 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप 127, शिवसेना ( शिंदे गट ) 54, राष्ट्रवादी ( अजित पवार ) पक्ष 35 जागांवर पुढे आहे. ठाकरेंची शिवसेना 18, काँग्रेस 20 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे.
हेही वाचा : शरद पवारांनी सांगितल्या ‘मविआ’च्या किती जागा येणार? NCP च्या उमेदवारांना म्हणाले, जोपर्यंत…