घरमहाराष्ट्रदारू, चिकनवर मारुन ताव !

दारू, चिकनवर मारुन ताव !

Subscribe

तळीरामांचा उसना आव

श्रीवर्धन आणि महाड विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी चुरस वाढत चालली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून ‘खर्चा कम और चर्चा ज्यादा हो रही है’ याकरिता तळीरामांनी एकच धंदा पत्करला आहे. दारू, मटण, चिकन याच्यावर ताव मारायला सुरुवात केली आहे. परमिट रुम, हॉटेल या कालावधीमध्ये ठप्प झाली आहेत.
तळीराम मात्र गावागावात रात्रीच्या वेळेस पार्सल आणून ठराविक ग्रुपने बसून मजा करत आहेत. माणगांव तालुक्यात या प्रकारांचा जास्त जोर आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवार जास्त खर्च करत नसल्यामुळे तळीरामांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. कोणतीही निवडणूक आली की उमेदवारांच्या जवळ असणार्‍या तळीरामांची खायची प्यायची मजा कुछ और असते. त्यामुळे तळीराम मंडळी निवडणुका आल्या की जाम खूश असतात.

या निवडणुकामंध्ये सकाळी आघाडीचा प्रचार संध्याकाळी युतीचा प्रचार असा प्रकार चालू असतो. या प्रचारामध्ये ही तळीराम मंडळी हेरांचे कामही करत असतात. कोण कार्यकर्ता कोणत्या उमेदवारासोबत फिरत असतो ते उमेदवारांना या तळीराम मंडळींकडून लगेचच समजत असते. त्यामुळे पैसे न घेता फक्त मजा करणे हाच एकमेव धंदा तळीरामांनी अंगीकारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -