घरमहाराष्ट्रलोकांना गृहीत धऱण्याचा भाजपचा डाव उलटला!

लोकांना गृहीत धऱण्याचा भाजपचा डाव उलटला!

Subscribe

विधानसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीला २२० च्या वर जागा मिळतील आणि भाजप महायुतीमधील मोठा भाऊच राहून भाजप १४० जागा मिळतील, असे सांगितले होते. पण, प्रत्यक्षात निकाल हाती आल्यानंतर चित्र बदललेले दिसले. भाजपचा वारू शंभरीच्या जवळथांबलेला दिसला. आमच्या समोर विरोधकच उरलेले नाहीत, असापंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीयअध्यक्ष अमित शहा आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचा सूर लागला होता. भाजपच्या या आक्रमणासमोर काँग्रेसने हाय खाऊन प्रचारच सोडून दिला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सत्ताधार्‍यांच्या मोठ्या आक्रमणासमोर ठामपणे उभे राहिले. परिणामी भाजपच्या प्रचंड मोठ्या विजयाच्या डरकाळ्या हवेत विरून गेल्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि नेते यांनालाल पायघड्या घालून भाजपने प्रवेश दिला होता. पण, लोकांनी त्यांना झिडकारून अशा गद्दारांना धडा शिकवला, मुख्य म्हणजे आयारामांच्या जीवावर विरोधी पक्षांना संपवण्याचे भाजपचे मनसुबे सफल होऊ शकले नाहीत. २०१४ ला स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने१२३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी एवढ्या जागा तर राखता आल्या नाहीच, पण त्यापेक्षा १५-२० जागा जिंकून एकहाती बहुमत मिळवण्याच्या भाजपच्या अतिआत्मविश्वासाला शेवटी तडा गेला. शहरी भागात वर्चस्व असलेल्या भाजपला लोकसभेचे निकाल पाहता ग्रामीणभागातूनही मोठे यास मिळेल, असे वाटत होते. पण, ग्रामीण भागात लोकांच्या मनात सत्ताधार्‍यांविषयी राग होता. पाच वर्षांत ज्या काही घोषणा केल्या होत्या, त्या पूर्ण होताना दिसल्या नाहीत. शेतीचे बजेट कोसळत असताना सिंचन, रोजगाराच्या बाजूवर अपयश दिसत होते. शेतकरी कर्जमाफीचाहीअपेक्षित फायदा बळीराजाला झाला नाही.

- Advertisement -

राज्याचे प्रश्न अधांतरित असताना राज्यातील जनतेला ३७० कलम, तलाकचा रद्द केलेला फतवा असे राष्ट्रवादाचे गाजर दाखवले जात होते. भाजपच्या देशपातळीवरील या कामांचा लोकांच्या मनात आदर होता, पण हि लोकसभेची नाही तर विधानसभेचेही निवडणूक आहे आणि या राज्यातील प्रश्न सुटले पाहिजे, असे लोक सांगत होते. ग्रामीण भागात तसे उघड बोलले जात होते. पण, आता आपल्याला कोणी रोखू शकत नाही, या भ्रमात असलेल्या भाजपला ऐकू जात नव्हते. शेवटी मतदारांनी त्यांना लगाम घालत लोकांन गृहीत धरू नका, असे दणक्यात सुनावले.भाजपचे हवेत उडणारे विमान लोकांनी फक्त खाली उतरवले नाही, तर फडणवीस सरकारमधील दिग्ग्जमंत्र्यानांही पराभूत करत धडा शिकवला, हे या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनाही घरचा रस्ता दाखवला.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -