Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र .... तर भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देऊ; नार्वेकरांचं मोठं वक्तव्य

…. तर भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देऊ; नार्वेकरांचं मोठं वक्तव्य

Subscribe

विधानसभा अध्यक्षांकडे प्रतोद आणि 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि नेमका राजकीय पक्ष कोणता याबाबत निर्णय घेणार असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले.  माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्यही केलं आहे. 

महाराष्ट्रासह देशभराला ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी दिला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या अनेक निर्णयांना चुकीचं ठरवलं आहे. तसचं, राज्यपालांच्या भूमिकेवर कडक शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. एकनाथ शिंदे हे गटनेते म्हणूनही बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांकडे प्रतोद आणि 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि नेमका राजकीय पक्ष कोणता याबाबत निर्णय घेणार असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले.  माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्यही केलं आहे.  (Assembly speaker Rahul Narvekar clear his stand on Disqualified MLA and real Shivsena )

शिंदे गटाचे पक्षाचे प्रतिनिधीत्व करतो असं समोर आल्यास भरत गोगावलेंची निवड मान्य करावी लागेल, असं नार्वेकर म्हणाले. भरत गोगावलेंच्या निवडीला मान्यता देताना आम्ही ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते की नाही याची खातरजमा न करता दिली. त्यामुळे तो निर्णय न्यायालयाने बाद ठरवला आहे. पण याचा अर्थ कायमच भरत गोगावलेंची निवड नियमबाह्य आहे असं होणार नाही. उद्या जर असं समोर आलं की राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडेच होता, तर आम्ही त्यांनाच मंजुरी देऊ. उद्धव ठाकरे राजकीय पक्षाचे अध्यक्ष होते, असं समोर आलं तर त्यांनी ज्याची निवड केली आहे त्यांना मान्यता द्यावी लागेल, असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: निर्णय लवकर घेणार परंतु घाई करणार नाही; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं )

या प्रक्रियेला किती वेळ लागले यावर उत्तर देत असताना नार्वेकर म्हणाले की, वाजवी वेळ हा व्यक्तीसापेक्ष आहे. प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असेल. हे लगेच होण्यासारखं काम नाही. पण शख्य तेवढं हे प्रकरण निकाली काढण्याचा आपण प्रयत्न करु. पण कोणत्याही प्रकारची घाई गडबड केली जाणार नाही. माझ्यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. कारणाशिवाय दिरंगाई केली जाणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -