घरताज्या घडामोडीAssembly winter session: हिवाळी अधिवेशनाचे आठडाभराचे कामकाज कसे असणार ? लसीचे दोन...

Assembly winter session: हिवाळी अधिवेशनाचे आठडाभराचे कामकाज कसे असणार ? लसीचे दोन डोस बंधनकारक

Subscribe

राज्याचे विधानसभा हिवाळी अधिवेशन बुधवार २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संकटामुळे अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत येणाऱ्या मंत्र्यांना, आमदारांना, अधिकाऱ्यांनी कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या सदस्यांचे दोन लसीचे डोस पूर्ण झाले नाही त्यांना अधिवेशनात बसता येणार नसल्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने घेतला आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज ७ दिवस चालणार असून शुक्रवार २४ डिसेंबरला पुरवण्या मागण्यांवर चर्चा आणि सोमवार २७ डिसेंबरला पुरवणी विनियोजन विधेयक घेण्यात येणार आहेत.

राज्यातील हिवाळी अधिवेशन कोरोनाप्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले होते. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यात येत आहे. सर्व सदस्यांना कोरोना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असल्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने घेतला आहे. सर्व मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांचा पहिला आणि दुसऱ्या लसीचा डोस घेतल्याबाबतची माहिती बुधवार १५ डिसेंबरपर्यंत आरोग्य विभागाकडून मागविण्यात आली आहे.

- Advertisement -

असे असेल सदनातील कामकाज

बुधवार, २२ डिसेंबर २०२१ – अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्या सादर करणे, शासकीय कामकाज, शोक प्रस्ताव

गुरुवार २३ डिसेंबर २०२१ – शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव

- Advertisement -

शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ – सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला व शेवटचा दिवस), शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज विधेयके

शनिवार २५ डिसेंबर २०२१ – सुट्टी

रविवार २६ डिसेंबर – सुट्टी

सोमवार – २७ डिसेंबर २०२१ – पुरवणी विनियोजन विधेयक, शासकीय कामकाज, अंतिम आठवडा प्रस्ताव

मंगळवार – २८ डिसेंबर २०२१ – शासकीय कामकाज, सत्तारुढ पक्षाचा प्रस्ताव

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार?

विधानसभा अध्यक्षांची जागा अद्यापही रिक्त आहे. विना विधानसभा अध्यक्ष असं हे तिसरं अधिवेशन असेल. यापुर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन विना अध्यक्षच पार पा़डण्यात आले. पंरतु या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होईल असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. अद्यापही राज्य सरकारमध्ये अनेक आमदारांनी लसीचे दोन डोस घेतले नाही आहेत. तसेच कामकाज समितीने दोन लसीचे डोस घेतली नसतील त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली आहे. यामुळे काँग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -