Homeमहाराष्ट्रMaharashtra : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची मदत; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची...

Maharashtra : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची मदत; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती

Subscribe

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 5 लाख 30 हजार शेतकऱ्यांना 535 कोटी 65 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

मुंबई (प्रेमानंद बचाव) : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 5 लाख 30 हजार शेतकऱ्यांना 535 कोटी 65 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज, गुरुवारी (9 जानेवारी) दिली. मार्च 2023 पासून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9 हजार 307 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (Assistance of Rs 535 crore distributed to 5 lakh 30 thousand farmers affected by natural calamities)

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मकरंद जाधव पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारकडून आपत्ती बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्याने प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे जाधव-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : 10 हजार नवउद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट; मुख्यमंत्र्यांची माहिती

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य सरकार संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान नाशिक महसूल विभागातील जळगाव जिल्ह्यात 4 हजार 274 शेतकऱ्यांना 5 कोटी 65 लाख रुपये, नाशिक जिल्ह्यातील 5 हजार 42 शेतकऱ्यांना 4 कोटी 43 लाख रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 हजार 975 शेतकऱ्यांना 2 कोटी 54 लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46 लाख  रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2 लाख 78 हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी दिली.

हेही वाचा – Eknath Shinde : रंग बदलणाऱ्या सरड्याची ही नवीन जात…ठाकरे-फडणवीस भेटीवर काय म्हणाले शिंदे


Edited By Rohit Patil