घरताज्या घडामोडीमाजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची उचलबांगडी

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची उचलबांगडी

Subscribe

भाजपने शिवसेना बंडखोरांना हाताशी घेऊन त्यांना पाठिंबा देत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला पायउतार करीत सत्ता मिळवली आहे. त्यानंतर काही तासातच शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेल्या ठाकरे कुटुंबातील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची व आणखीन दोन अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.

किरण दिघावकर यांची, ‘ई’ वार्ड भायखळा येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर के/ पूर्व वार्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची नेमणूक करण्यात अली आहे. तसेच, ‘ई’ वार्डाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांची के/ पूर्व वार्ड येथे बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात काही दिवसांपासून राजकीय खलबते झाली. भाजपच्या गळाला शिवसेनेत असमाधानी असलेल्या ३९ आमदारांची टीम लागली. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. अखेर सत्तांतर झाले. आता महाराष्ट्राची सत्ता शिवसेनेतून फुटलेले आमदार व भाजप यांच्या हाती आली. काही तासातच पालिकेत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली.


हेही वाचा : व्हिप कारवाईतून आदित्य ठाकरेंना वगळलं, १४ आमदारांना नोटीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -