घरताज्या घडामोडीअजितदादा म्हणतात, चीनसारखं हॉस्पिटल बांधायला आपल्याला 'तीन' वर्ष लागतील

अजितदादा म्हणतात, चीनसारखं हॉस्पिटल बांधायला आपल्याला ‘तीन’ वर्ष लागतील

Subscribe

चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर चीन सरकारने अवघ्या काही दिवसांत एक हजार खाटांचे हॉस्पिटल बांधले. हे हॉस्पिटल बांधतानाचे अनेक व्हिडिओ जगभरात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चीनच्या या तत्परतेचे सगळीकडून कौतुक झाले. मात्र अशी परिस्थिती भारतात उद्भवल्यास आपण किती दिवसांत असे सुसज्ज हॉस्पिटल उभारू शकतो? हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी यावर उत्तर दिले आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने घेतलेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी करोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावावर भाष्य केले. ते म्हणाले, “चीन सारखे हॉस्पिटल आपल्याकडे बांधायचे झाल्यास आपल्याला ३ वर्षांचा कालावधी लागला असता. इतर देशांत करोनासंबंधी जी काळजी घेतली जात आहे. तशी आपणही घ्यायला हवी.”

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उदघाटनाप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेली मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. त्यानंतर अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवार म्हणाले की, “पंगत बसली असून मी वाढपी आहे. कुणाला किती वाढायचं ते माझ्या हातात आहे. राज्यातील सर्व आमदारांचा निधी २ कोटींवरुन ३ कोटी केलेला आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत कुणाचीही सत्ता असली तरी कारभारात पारदर्शकपणा असला पाहिजे. मी जोपर्यंत मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत पुणे शहराच्या विकासात मी कुठलंही राजकारण करणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -