घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'खुर्चीत बसणार्‍याला तरी मुख्यमंत्री करायला हवे होते'; सत्तारांचा उध्दव ठाकरेंना टोला

‘खुर्चीत बसणार्‍याला तरी मुख्यमंत्री करायला हवे होते’; सत्तारांचा उध्दव ठाकरेंना टोला

Subscribe

नाशिक : जनतेची कामे करण्यासाठी किमान खुर्चीत बसणार्‍याला मुख्यमंत्री करा असे मी बोललो होतो. रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव देणारा मी एकमेव आमदार होतो. कारण अडीच वर्षात उध्दव ठाकरे केवळ चार वेळात मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसले. मंत्री असून मी मंत्रालयातील सहावा मजला कधी पाहिला नाही तिथे सर्वसामान्यांचे काय? असे म्हणज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उध्दव ठाकरे यांना डिवचले.

नाशिक येथे आयोजीत कृषीथॉन प्रदर्शनाच्या निमित्ताने सत्तार हे नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून आज ते बुलढाण्यात आहेत याविषयी विचारले असता सत्तार म्हणाले, नेत्यांनी बाहेर जायला हवे, लोकांची मते जाणून घ्यायला हवीत. परंतू उध्दव ठाकरेंनी जे यापूर्वी करायला हवे होते ते आता करताहेत कदाचित त्यांना ४० लोक सोडून गेल्याचा पश्ताप झाला असेल. त्यामुळे आता अभ्यास करायला ते चालले असतील तर चांगलेच आहे. आधीचे मुख्यमंत्री मंत्री, आमदारांना भेटत नव्हते असे सांगत त्यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे घरण्याच्या दुसर्‍या व्यक्तीला मुख्यमंत्री करावे असे माझे मत होते. मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यामुळे मला वाटून काय उपयोग शरद पवार आणि सोनिया गांधी यांनाही मान्य असायला हवे होते, असे सत्तार म्हणाले. उध्दव ठाकरे अडीच वर्षात केवळ चारवेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -