मुंबई : मुंबईतील किंवा पुण्यातील अनेक लोकं दररोज मुंबई-पुणे हा प्रवास करत असतात. कोणी ट्रेनने तर कोणी स्वत:च्या गाडीने असा रोजचा मुंबई ते पुणे तसेच पुणे ते मुंबई प्रवास करताना दिसतात. मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा असून, मागील काही वर्षांमध्ये हा आकडा सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. याच आधारे प्रवाशांची गरज लक्षात घेत एसटी महामंडळांने या मार्गावर अधिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले आहे. पुणे-मुंबई, मुंबई-पुणे हा प्रवासाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा एसटीकडून सुरु करण्यात आला. त्यानंतर या मार्गांवरून ई-शिवनेरी सेवेला 10 मे 2024 पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 32 हजार 618 जणांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. या मार्गावरील प्रवासाला मिळणारा प्रतिसाद पाहता एसटीच्या अटल सेतूमार्गे दादर ते स्वारगेट आणि दादर ते चिंचवड या मार्गांवर सुरू असलेल्या शिवनेरी बससेवेला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. (journey of shivneri from atal setu great response from passengers.)
हेही वाचा : Deepak Kesarkar : नवा CM कोण होणार? शिंदे मुख्यमंत्रिपदावरून नाराज? केसरकरांनी सगळंच क्लिअर सांगून टाकलं…
अटल सेतूवरून दादर-स्वारगेट मार्गावर 10 मे ते 22 नोव्हेंबरदरम्यान तसेच दादर-चिंचवड मार्गावर 10 मे ते 1 सप्टेंबरपर्यंत ही सेवा कार्यरत होती. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत महामंडळाने ही सेवा अटल सेतूवरून सुरू केली होती. मात्र या सेवेमुळे एसटी महामंडळाला 14 कोटी 77 लाख 400 रुपयांचा महसूल मिळाला आहे. ई-शिवनेरी सेवा उच्च दर्जाची, आरामदायी आणि वेळेवर पोहोचणारी असल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी माहिती महामंडळाला अपेक्षा होती.
हेही वाचा : Maharashtra Politics : मविआचा पराभव करण्यासाठी… ठाकरे गटाचा भाजपावर थेट आरोप
सुरुवातीला या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता, मात्र प्रवाशांमध्ये होणारी घट पाहता एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मे आणि जून महिन्यांच्या कालावधीमध्ये दादर-स्वारगेट मार्गावर प्रवासी संख्या प्रचंड असली तरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीमध्ये ती कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दादरवरून पुणे-चिंचवड अप आणि डाउन मार्गावरील शिवनेरी सेवा सप्टेंबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळांने दिला आहे. या मार्गावर प्रवासी संख्या घटल्याने महामंडळाने ही सेवा बंद केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या महिन्यात या मार्गावर फक्त 2400 प्रवाशांनी प्रवास केला, तर ऑगस्ट महिन्यामध्ये या मार्गावर केवळ 650 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे या मार्गावरील सेवा बंद करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Edited By komal Pawar Govalkar