घरक्रीडाआंतर विभागीय अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाण्याला सहा पदके

आंतर विभागीय अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाण्याला सहा पदके

Subscribe

ठाण्यातील खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांसह सहा पडकांवर आले नाव कोरले

ठाणे । मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठ स्टेडियम, मरीन लाइन्स येथे पार पडली. यामध्ये ठाण्यातील खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांसह सहा पडकांवर आले नाव कोरले आहे. यास्पर्धेतून निधी सिंग आणि सानिका नाटे यांची 3 ते 6 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या अश्वमेधमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर,आकांक्षा गावडे आणि अदिती पाटील या दोघी महाराष्ट्र राज्य 23 वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणारी निधी सिंग हीने 400 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक तसेच 400 मीटरमध्ये रौप्यपदक नवीन वैयक्तीक सर्वोत्तम कामगिरीसह मिळवले. तर सानिका नाटे हीने 100 मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले. सानिका तिच्या पहिल्याच प्रयत्नात मुंबई विद्यापीठाची सर्वात वेगवान महिला ठरली.

- Advertisement -

आकांक्षा गावडे हिला 400 मीटरमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदिती पाटील हीन 5 हजार मीटरमध्ये रौप्य कामगिरी केली असून 1500 मीटरमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके मिळवली. निधी सिंग आणि सानिका नाटे यांची औरंगाबाद येथे 3 ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान होणार्‍या अश्वमेधमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आकांक्षा गावडे आणि अदिती पाटील यांची उस्मानाबाद येथे 7 आणि 8 डिसेंबर 2022 रोजी होणार्‍या महाराष्ट्र राज्य 23 वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -