घरCORONA UPDATEकोरोना मृत्यूने पुणे हादरले! स्मशानभूमीत दररोज १०० हून अधिक अंत्यसंस्कारांमुळे वातावरण प्रदूषित

कोरोना मृत्यूने पुणे हादरले! स्मशानभूमीत दररोज १०० हून अधिक अंत्यसंस्कारांमुळे वातावरण प्रदूषित

Subscribe

धुरामुळे पुण्यातील प्रदूषणाची पातळीही उंचावल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरालाही कोरोनाचा सर्वाधिक धोका बसला आहे. गेल्या काही दिवासांपासून पुण्यातील कोरोनाची परिस्थिती ढासळत चालली आहे. कोरोनामुळे पुणे पूर्णपणे हादरुन गेले. पुण्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. पुण्यातील स्मशानभूमीत दिवसाला १०० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात भितीचे वातावरण आहे. सतत होणाऱ्या अंत्यसंस्कारांमुळे स्मशानभूमीच्या आजूबाजूला पाहणाऱ्या लोकांना त्याचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे स्माशानभूमीतील धूराचे लोटही गावकऱ्यांना सहन करावे लागत आहे. धुरामुळे पुण्यातील प्रदूषणाची पातळीही उंचावल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील कोरोनामुळे वाढणाऱ्या मृत्यूच्या संख्येमुळे पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होत आहे. दिवसाला १०० हून अधिक मृतदेहांना अग्नी दिल्याने मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. पुण्यातील नवीन पेठ,सदाशिव पेठ,पर्वती पायथा, फाटक बाग परिसर,रामबाग कॉलनी,लोकमान्य नगर,विजयानगर कॉलनी, सारसबाग इत्यादी परिसरात स्मशानभूमीतील आगीच्या धुराचे लोट तयार होत आहेत. नवी पेठेतील काही रहिवाश्यांनी स्मशानभूमीच्या अवैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली .

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, स्मशानभूमीतील चिमणी आणि इलेक्टिकल साधने अद्ययावत करणे, त्याचप्रमाणे चिमणीची उंची वाढवणे, स्मशानभूमीतील वातावरणाची पातळी आणि हवेचा दर्जा यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्मसानभूमीच्या परिसरात वायू प्रदूषण मीटर बसवावे,अशा मागण्या याचिकेमध्ये करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – कोरोनाची टेस्ट न करताच रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; कुडाळ शहरातील धक्कादायक प्रकार

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -