घरमहाराष्ट्रसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्यांवर हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्यांवर हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांना मारहाणीची ही घटना सोमवार आणि मंगळवारी रात्री घडली. आरोपी तीन मोटारसायकलवरून आले होते, त्यांना येऊर प्रवेशद्वारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवले. प्रवेश नाकारल्याने त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

महाराष्ट्रातील ठाणे शहरातील पोलिसांनी वन अधिकाऱ्यांना मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांना मारहाणीची ही घटना सोमवार आणि मंगळवारी रात्री घडली. आरोपी तीन मोटारसायकलवरून आले होते, त्यांना येऊर प्रवेशद्वारावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवले. प्रवेश नाकारल्याने त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ( Attack on forest personnel in Sanjay Gandhi National Park A case has been registered against five people in Vartak Nagar )

या घटनेनंतर वर्तक नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. वर्तक नगर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणाले की, स्थानिक रहिवासी, सरकारी अधिकारी आणि विशेष परवानगी असलेले लोक वगळता इतर लोकांना या जंगलात सायंकाळपासून सकाळपर्यंत प्रवेश दिला जात नाही.

- Advertisement -

आरोपींना जंगलात जाऊ न दिल्याने त्यांनी वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. वन कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मारहाणीनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून जंगलात प्रवेश केला.

( हेही वाचा: चित्तथरारक एमआरएफ सुपरक्रॉस रेसिंग स्पर्धेची उत्सुकता शिगेला; २ दिवस बाकी )

- Advertisement -

नीलेश बादल, सुदान अली, प्रकाश सौद, पवन लोखंडे आणि रोहित केदारे अशी या पाच आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी बिबट्याचे पिल्लू घेतलं दत्तक

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) पाच वर्षांचे बिबट्याचे पिल्लू दत्तक घेतले. मंत्र्यांचे पुत्र जीत आठवले, वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक एस. मल्लिकार्जुनला १.२० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा यांना SGNP च्या वन्य प्राणी दत्तक योजनेअंतर्गत बिबट्या (पँथेरा परडस) दत्तक घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. मंत्र्यांना निसर्ग आणि वन्यजीव आवडतात, असे एका सहाय्यकाने सांगितले. पर्यावरण आणि वन्यजीव वाचवण्यात त्यांचे योगदान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -