घरताज्या घडामोडीतिसर्‍या मजल्यावरुन पडलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणीची धडपड

तिसर्‍या मजल्यावरुन पडलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणीची धडपड

Subscribe

‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हणतात. गंगापूर रोडवरील एका भटक्या कुत्रीला ही म्हण शब्दश: लागू पडली. ही कुत्री पंपिंग स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गच्चीवरुन म्हणजे सुमारे ५० फुटावरुन खाली पडली. साक्षी मनोज चांदवडे या तरुणीने या कुत्रीला आपल्या दुचाकीवर घेत प्राण्यांचा दवाखाना गाठला.

‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हणतात. गंगापूर रोडवरील एका भटक्या कुत्रीला ही म्हण शब्दश: लागू पडली. ही कुत्री पंपिंग स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गच्चीवरुन म्हणजे सुमारे ५० फुटावरुन खाली पडली. खाली पडल्यावर धप्प असा आवाज झाल्याने इमारतीतील काही मंडळी तत्काळ जमा झाली. त्यातील साक्षी मनोज चांदवडे या तरुणीने या कुत्रीला आपल्या दुचाकीवर घेत प्राण्यांचा दवाखाना गाठला. तेथे औषोधोपचार आणि महागडे इंजेक्शन दिल्याने कुत्रीचे प्राण वाचले. एका भटक्या कुत्र्याची आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सुश्रूषा करणार्‍या साक्षीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही कुत्री पंपिंग स्टेशन परिसरात वास्तव्यास आहे. तिच्या शरीरावरील चमकदार केसांमुळे येथील लहान मुलांनी तिचे नाव शनशाईन ठेवले आहे. शनशाईन म्हणजे परिसरातील अबालवृद्धांची जीव की प्राण ! तिला दररोज कुणी बिस्किटे देतात तर कुणी दूध. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सनशाईन पंपिंग स्टेशन परिसरातील पूजा ग्लोरी अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावर गेली. गच्चीवरुन दुसर्‍या बाजूच्या कठड्यावर उडी मारण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि थेट ती इमारतीवरुन खाली पडली. खाली फरशी असल्याने पडताक्षणी जोरदार आवाज झाला. त्यामुळे इमारतीतील काही रहिवाशी आवाजाच्या दिशेने धावले. खाली जाऊन बघताच प्रत्येकाला घाम फुटला. इमारतीतील सर्वांचीच आवडती सनशाईन वेदना असह्य झाल्याने जीवाच्या आकांताने विव्हळत होती. ती जखमी झालेली दिसत नसली तरी जोरदार मुका मार बसल्याचे जाणवत होते. हे बघून इमारतीतील रहिवाशी साक्षी चांदवडे या तरुणीने आपल्या वहिनीला बरोबर घेत दुचाकी काढली. काही वेळातच अशोक स्तंभ परिसरातील जनावरांचा दवाखाना गाठला. सायंकाळी उशिर झाल्याने हा दवाखानाही बंद होता. त्यामुळे महात्मा नगर येथील एका खासगी दवाखान्याकडे साक्षीने मोर्चा वळवला. परंतु दुर्देवाने हा दवाखानाही बंद होता. अखेर गंगापूर रोडवरील डॉ. दिग्विजय पाटील यांच्याकडे सनशाईनवर उपचार करण्यात आले. यावेळी तिला महागडे इंजेक्शन देण्यात आले. पण हा खर्च करताना साक्षीने कोणताही पुढचा मागचा विचार केला नाही. आता सनशाईनची काळजी चांदवडे कुटुंबिय घरातील सदस्याप्रमाणे घेत आहेत. पुढच्या आठवड्यात तिला पुन्हा इंजेक्शन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

माणुसकी अजूनही शिल्लक-

कोविडच्या काळात माणुसकीला काळीमा फासणार्‍या असंख्य घटना समोर आल्या. स्वत:च्या सख्ख्या नातेवाईकांना मृत्यूच्या दारी सोडून गेलेल्यांचे प्रमाण या काळात मोठे होते. परंतु त्यानंतर साक्षी चांदवडेसारख्या तरुणीची भूतदया बघता माणुसकी अजूनही शिल्लक आहे, ही सुखावणारी भावना पुन्हा एकदा जागृती झाल्याचे दिसून आले.

तिसर्‍या मजल्यावरुन पडलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणीची धडपड
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -