Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राठोडांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बंजारा समाजाच्या महंतांचा पाठिंबा

राठोडांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बंजारा समाजाच्या महंतांचा पाठिंबा

हा संजय राठोड यांच्या बदनामीचा प्रयत्न असून यांच्यावर कितीही आरोप झाले तरी बंजारा समाज त्यांच्या पाठिशी उभा आहे,असे स्पष्ट मत बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र संजय राठोड यांच्या पाठीशी आता बंजारा समाजातून पाठिंबा समोर येत आहे. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी नुकतीच संजय राठोड प्रकरण आणि बंजारा समाजाची भूमिका मांडली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संजय राठोड यांना क्लिनचिट दिली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने उलटसुलट चर्चेचे वादळ उठलेले असतानाच समाजाच्या महंताची ही भूमिका महत्वाची मानली जात आहे. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले की, संजय राठोड साहेब हे विदर्भाचे वाघ आहेत. हा संजय राठोड यांच्या बदनामीचा प्रयत्न असून यांच्यावर कितीही आरोप झाले तरी बंजारा समाज त्यांच्या पाठिशी उभा आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोज यांचे नाव सातत्याने येत आहे. हा राठोड यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. संजय राठोड विदर्भाचे वाघ आहेत. आमच्या अडचणीवेळी ते नेहमी आमच्या पाठिशी उभे राहतात. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणात बंजारा समाज राठोड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. त्याच्यावर होणारा अन्याय आणि बंजारा समाजाची होणारी बदनामी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यासाठी आमच्या दोन बैठकाही पार झाल्या आहेत. येणाऱ्या पुढील काळात संजय राठोड स्वत:हून मीडियासमोर येतील आणि त्यांची भूमिका मांडतील असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणात अनेक ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून मंत्री संजय राठोड यांचा पूजाच्या आत्महत्येशी संबंध असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप्सवर आमचा जराही विश्वास नाही. फॉरेंन्सिक लॅबमधून अधिकृत माहिती येत नाही तोवर या विषयावर भाष्य करणे योग्य नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी काहीही करु शकते असे बंजारा समाजाचे महंता सुनील महाराज यांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक; राम कदमांचा आरोप

- Advertisement -

 

- Advertisement -