घरताज्या घडामोडीमहासभेत शिवसेनेकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न

महासभेत शिवसेनेकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न

Subscribe

नाशिकरोडला दुषित पाणीपुरवठा करण्यावरुन नगरसेवक संतप्त; भाजपसह प्रशासनाचा केला धिक्कार

नाशिकरोडला दुषित पाणीपुरवठा केल्याच्या मुद्यावरुन शिवसेनेने मंगळवारी (दि. १९) महासभेत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जनता पक्षासह प्रशासनाचा धिक्कार करीत नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रारंभापासूनच शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी नाशिकरोडचा पाणीप्रश्न उपस्थित करुन महापौरांच्या दौर्‍यानंतर आणि आदेशानंतरही प्रशासनाने चेहडी बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला केला, नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रशासनाने ठरवले आहे का असे सांगत त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख शिवाजी चव्हाणके यांना जाब विचारला. मात्र चव्हाणके यांनी तातडीने उत्तर न दिल्याने संतप्त नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या मांडला. यावेळी सत्ताधार्‍यांसह प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त विरोधीपक्ष नेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे आणि रमेश धोंगडे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. प्रशांत दिवे यांनी रौद्रावतार धारण करीत महापौरांना आव्हान दिले. गंगापूर धरणातून नाशिकरोडला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचे शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -