पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक; विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

पंकजा मुंडे समर्थकांनी दुपारच्या सुमारास भाजप कार्यालयात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

attempted suicide by poisoning a supporter for not giving candidature to bjp pankaja munde Vidhan Parishad Election

राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणुक होणार आहे. या विधान परिषदेसाठी भाजपाने नुकतेच आपले सहा उमेदवार जाहीर केले. (BJP candidates list announced for MLC Election) भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी जाहीर केली. मात्र या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. (Munde supporters protest outside Aurangabad BJP office) घातला.

पंकजा मुंडे समर्थकांनी दुपारच्या सुमारास भाजप कार्यालयात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी अहमदनगरमधील एका आक्रमक मुंडे समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंकुंद गर्जे असं या समर्थकाचे नाव आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयाच उपचार सुरु आहेत.


पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने भावना अनावर होत गर्जे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत गोंधळ घातला, दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

विधान परिषदेत भाजप पक्ष श्रेष्ठींनी गोपीनाथ मुंडेंचे समर्थक रमा शिंदे आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली. पण यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आले. विधान परिषदेत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. ताई नाही, तर भाजप नाही अशा आशयाची बॅनरबाजी अनेक ठिकाणी दिसून येतेय.


Monsoon 2022 : पुढील 48 तासात मान्सून कोकणात होणार दाखल, हवामान विभागाची माहिती