घरमहाराष्ट्रपुण्यात प्रसिद्ध सराफ व्यवसायिकांचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात प्रसिद्ध सराफ व्यवसायिकांचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू

पुण्यात एका प्रसिद्ध सराफ व्यवसायिक, मराठे ज्वेलर्सचे मालक वयवर्ष ६० असणारे मिलिंद उर्फ बळवंत यांनी छातीत गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येतेय. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

असा घडला प्रकार

पुण्यातील लक्ष्मी रोडवर मराठे ज्वेलर्स हे दुकान आहे. या ठिकाणीच हा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकरणी पुणे विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यवसायिक आहेत. लक्ष्मी रोडवरील दुकानात मराठे असताना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून अचानक आवाज आला. तो आवाज ऐकून दुकानातील कर्मचारी तिकडे धावले. तेव्हा मराठे यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी कर्मचार्‍यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे़.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला. मराठे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती मिळतेय.


बलात्काऱ्याला नपुंसक बनवणार; पाकिस्तानात कठोर कायदा संमत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -