घरCORONA UPDATEनालेसफाईच्या कामातून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न

नालेसफाईच्या कामातून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न

Subscribe

मागील महिन्यात नालेसफाईच्या कामांना मंजुरी दिल्यानंतरही एप्रिल महिना संपत आला तरी या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही.

मागील महिन्यात नालेसफाईच्या कामांना मंजुरी दिल्यानंतरही एप्रिल महिना संपत आला तरी या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. मात्र, लॉकडाऊनमध्ये सुट दिल्यानंतर या कामांना सुरुवात झाल्याचे चित्र आता निर्माण केले जात आहे. दोन-चार कंत्राटदारांना पोकलेन मशीन नाल्यात उतरवून सफाईचे काम सुरु असल्याचा दावा आता महापालिका प्रशासन करू लागले आहे. मागील अनेक पावसाळ्यांमध्ये पोकलेन, जेसीबी, रोबोट याप्रकारे यांत्रिक पध्दतीनेच केले जात असून महापालिका प्रशासन आम्ही हे काम शारीरिक अंतर राखून यांत्रिक पध्दतीने करत असल्याचाही दावा करत मुंबईकरांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबईतील पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे. मिठी नदीतील साफसफाईसह मोठ्या व छोट्या नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई वेगात सुरू झाली आहेत. दरवर्षीप्रमाणेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईची बहुतांश कामे सुरू झाली आहेत. यंदाच्या नालेसफाईचे वेगळेपण म्हणता येईल, ते म्हणजे ‘कोरोना कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ही कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात असल्याचा दावा प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकामार्फत केला आहे.

- Advertisement -

मुंबईत एकूण २८० मोठे नाले

मुंबईत  सुमारे २६४ किलोमीटर लांबीच्या २८० मोठ्या नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये शहर भागातील सुमारे २२ किलोमीटर लांबीचे २७ मोठे नाले, पूर्व उपनगरातील १०२ किलोमीटर लांबीचे १११ मोठे नाले, तर पश्चिम उपनगरातील १४० किलोमीटर लांबीचे १४२ मोठे नाले यांचा समावेश आहे.

सुमारे साडेतीन लाख मेट्रीक टन गाळ काढला जाणार

एकूण कंत्राट कालावधीदरम्यान या साफसफाईद्वारे सुमारे ३ लाख ६२ हजार ६३८ मेट्रीक टन एवढ्या प्रमाणातील गाळ उपसला जाईल. यापैकी ३६ हजार ४२७ टन एवढा गाळ शहर भागातील मोठ्या नाल्यांमधून, पूर्व उपनगरांमधील मोठ्या नाल्यांमधून १ लाख २२ हजार ७७० टन; तर पश्चिम उपनगरांमधील मोठ्या नाल्यांमधून २ लाख ३ हजार ४४१ टन एवढा गाळ काढला जाईल असा अंदाज आहे. महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या दरवर्षीच्या पद्धतीनुसार तसेच कंत्राटातील अटी व शर्तीनुसार सुमारे ७० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी, तर पावसाळ्यादरम्यान व त्यानंतर उर्वरित ३० टक्के गाळाचा उपसा केला जाणार आहे. तसेच एकूण २१.५०५ किलोमीटर एवढ्या लांबीचे मिठी नदीचे क्षेत्र आहे. मिठी नदीमधून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन एवढा गाळ उपसला जाणार आहे. ज्यामध्ये ७० टक्के गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई दरम्यान काढला जाणार आहे.

- Advertisement -

मिठीनदीचे क्षेत्र व काढला जाणारा गाळ

शहर भाग : ६.२५५ किलोमीटर लांब, काढला जाणारा गाळ : सुमारे ५९ हजार ५८० टन

पूर्व उपनगर : १३.०३ किलोमीटर लांब, काढला जाणारा गाळ ५४ हजार २५० टन

पश्चिम उपनगर : २.२२ किलोमीटर लांब, काढला जाणारा गाळ २४ हजार टन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -