घरताज्या घडामोडीसुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं, अतुल भातखळकरांचा टोला

सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं, अतुल भातखळकरांचा टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरूंगात आहेत. आज नाही तर उद्या न्यायालयाकडून त्यांना न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. तसेच हे माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा दोघांना क्लीनचीट मिळेल, तेव्हा माझं रेकॉर्डिंग दाखव, अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा कोणताही दोष नसताना त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे, हा सुप्रिया सुळे यांचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणे आहे. देशमुखांची चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली,मलिक यांच्याबाबतीत प्रत्येक न्यायालयाने प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे सांगितले आहे, असं ट्विट करत भातखळकरांनी सुळेंवर टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

दोन्ही प्रकरणांत काय होतंय हे मला माहितीये. कशाप्रकारे जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तुम्ही डेटा काढून पाहा, जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. त्यांनी १०९ वेळा देशमुख कुटुंबियांच्या घरी धाड टाकली आहे. तर १०८ वेळा धाड टाकताना काय केलं?, १०९ व्यांदा धाड टाकावी लागली. कारण त्यांना १०८ वेळा काहीच मिळालं नाही, असं सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

पुढे सुळे म्हणाल्या की, हे सर्व आश्चर्यचकित करणारं आहे. ज्या व्यक्तिवर सर्व आरोप आहेत. तोच आज माफीचा साक्षीदार होतोय, हे दुसरं आश्चर्य आहे. ज्यांनी स्वत: कबुल केलंय तो आज माफीचा साक्षीदार कसा बनू शकतो, हा कोणता न्याय आहे, असा प्रश्न सुळेंनी यावेळी उपस्थित केला आहे.


हेही वाचा : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -