राज्यातले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले तर देशमुख जाण्याच्या तयारीत, भातखळकरांची टीका

ठाकरे मंत्रिमंडळात खो खो चा खेळ सुरु आहे.

Atul Bhatkhalkar criticizes anil deshmukh and state government
राज्यातले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले तर देशमुख जाण्याच्या तयारीत, भातखळकरांची टीका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरु आहे. अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीस हजर राहणार नसल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारचे मंत्री तुरुंगात जाऊन आले तर माजी मंत्री जाण्याच्या तयारीत आहेत. अशी खोचक टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्रिमंडळात खो-खो चा खेळ सुरु आहे. तर देशमुख लपाछपी खेळतायत असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात “खो खो” खेळ सुरु आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळतायत. दूध का दूध, पानी का पानी ची गर्जना करणारे गेले काही दिवस गायब आहेत. बहुधा त्यांचं दूध नासलंय असा टोला भातखळकर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. राज्यातले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत. देशमुख जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे मंत्रिमंडळात खो खो चा खेळ सुरु आहे. अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

देशमुख नॉट रिचेबल

ईडीने दिलेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांच नेमकं ठिकाण माहीत नाही. अशी प्रतिक्रिया ईडीने दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहेत. मात्र अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत चौकशीस प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही असे सांगितले आहे. तर व्हिसीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. तर

अनिल देशमुखांना जेलमध्ये जावे लागणार

ईडीच्या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख पळून गेले, अशा शब्दात निशाणा साधला. “अनिल देशमुख आजपण ईडीच्या हाती नाही लागले. पळून गेले. काही लोकांना भीती आहे की विदेशात तर नाही निघून गेले. पण मी विश्वासाने सांगतो, आज, उद्या, परवा…कधीतरी ईडीच्या हाती लागणार आणि त्यांना जेलमध्ये जावं लागणार,” असं किरीट सोमैय्या म्हणाले.