घरताज्या घडामोडीजो पाप करतो तोच घाबरतो, आमची चौकशी बिनधास्तपणे करा ; भातखळकरांचं राऊतांना...

जो पाप करतो तोच घाबरतो, आमची चौकशी बिनधास्तपणे करा ; भातखळकरांचं राऊतांना खुलं आव्हान

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल(मंगळवार) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी त्यांचे पुरावे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. तसेच जो पाप करतो तोच घाबरतो, तुम्ही आमची  चौकशी बिनधास्तपणे करा, असं खुलं आव्हान अतुल भातखळकरांनी राऊतांना दिलंय.

अतुल भातखळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राऊतांनी त्यांचे पुरावे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्यावेत. जर राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग उच्च न्यायालयात पुरावे सादर करा. परंतु वस्तुस्थिती म्हणजे संजय राऊत हे भेदरले आहेत. कारण जो पाप करतो तोच घाबरतो. तुम्ही आमची चौकशी करा.

- Advertisement -

महाराष्ट्र म्हणजे राऊत नव्हे

संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र आहेत का?, साधं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडून आले नाहीत. शिवसेना पक्षाने आमच्या पक्षासोबत युती न केल्यामुळे त्यांना शंभर सुद्दा जागा मिळाल्या नाहीत. संजय राऊतांना असं वाटतंय की, त्यांच्या भांडूपचं घर आणि मातोश्री हे महाराष्ट्र आहे. हा त्यांचा गैरसमज असून महाराष्ट्र म्हणजे राऊत नव्हे, असं म्हणत  भातखळकरांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.

राऊत आता कंपाऊंडरकडूनही गोळ्या घेत नाहीयेत

संजय राऊत आता कंपाऊंडरकडूनही गोळ्या घेत नाहीयेत. महाराष्ट्र राज्याचं एक इकोनॉमिक ऑफेन्सिस विंग आहे. धमक्या दिल्यानंतर एक्स्टॉरन्शन सेल असतो. त्या एक्स्टॉरन्शन सेलमध्ये ज्यांना कोणालाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्यांनी तक्रार दाखल करावी. तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहीजे. परंतु ते हे सर्व काहीही करत नाहीयेत. कारण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाहीये. राज्याचे पोलीस मुख्यमंत्र्यांचं ऐेकत नाहीयेत आणि गृहमंत्री अस्तित्वात नाहीयेत.

- Advertisement -

किरीट सोमय्या भाजपसाठी जबाबदार आहेत का ?

किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते आहेत. परंतु संजय राऊत ज्या पद्धतीचे आरोप जबाबदार पद्धतीने करत आहेत. त्या आरोपांची माहिती त्यांनी द्यावी. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाचं कनेक्शन भाजपसोबत जोडण्यात येत होतं. परंतु त्यासंदर्भातील चौकशीचं काय झालं, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यावं. आर्यन खान प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांनी लाच घेतली. त्यामुळे त्यांनी एसआयटी नेमली होती. त्या एसआयटीचं काय झालं? मोहन डेलकर यांनी मुंबईत आल्यानंतर आत्महत्या केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे या चौकशीसाठी एसआयटी नेमण्या आली होती. त्याचं काय झालं, असा सवाल भातखळकरांनी विचारला आहे.


हेही वाचा : नव्या वर्षात मध्य रेल्वेवर ३६ नवीन लोकल फेऱ्या, पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या मार्गिकेचे उद्घाटन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -