घरताज्या घडामोडीस्वतः लस खरेदी प्रक्रिया करण्याचे सोडून राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतंय -...

स्वतः लस खरेदी प्रक्रिया करण्याचे सोडून राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतंय – अतुल भातखळकर

Subscribe

राज्य सरकारने एकुण ७.७९ लाख डोस खरेदी करण्यास मान्यता का दिली?

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. परंतु यामध्ये आता १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांना राज्य सरकार लसीकरण करणार आहे. तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे केंद्र सरकार लसीकरण करणार आहे. १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु राज्य सरकार स्वतः लसीचे डोस खरेदी करण्याच्या प्रक्रिया सुरु करण्याचे सोडून केंद्राकडे बोट दाखवत असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे वेळ आल्यामुळे राज्य सरकारने १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचे लसीकरणाची गती धिमी करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे भातखळकरांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणात म्हटले आहे की, देशात उत्पादित होणाऱ्या ५० टक्के लसींचे डोस राज्य सरकारला खरेदी करण्याची मुभा असेल यामध्ये खासगी कंपन्यांनाही लसींचे डोस खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्राने लस खरेदी करण्याची परवानगी दिली असली तरी अद्याप राज्य सरकारकडून लसींचे डोस खरेदी करण्याची कोणतीही प्रक्रिया केली नाही. खासगी रुग्णालयांनी लसींचे डोस खरेदी करुन लसीकरण सुरु केले परंतु राज्य सरकारने लस खरेदी करण्यास उशीर केला आहे. राज्य सरकारने तत्परता दाखवत तात्काळ लस खरेदी केले असते तर मोठ्या प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध झाले असते. महाविकास आघाडी सरकारने ते का केले नाही? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. राज्याला १२ कोटी लसींच्या डोसची गरज असताना राज्य सरकारने एकुण ७.७९ लाख डोस खरेदी करण्यास मान्यता का दिली? असा प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरणावरुन केलेल्या वक्त्वव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. – पक्षाचे मुख्यमंत्री अशी टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -