घरताज्या घडामोडीबार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाल्यास मराठा आरक्षणावर लक्ष द्या, भातखळकरांचा शरद पवारांना...

बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाल्यास मराठा आरक्षणावर लक्ष द्या, भातखळकरांचा शरद पवारांना टोला

Subscribe

बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतर शरद पवार आपल्या राहत्या घरी विश्रांती घेत होते. कोरोना काळात हॉटेल व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना वीज बिलात सवलत आणि करात सूट मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन पत्र लिहिले आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणासाठी नाही तर १०० कोटीच्या बोजाने दबलेल्या बार मालकांसाठी पत्र लिहिले अशी खोचक टीका भातखळकरांनी केली आहे.

बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटला

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्या पत्रावरुन निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो अशा खोचक शब्दात अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी आणि शरद पवारांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

दरम्यान पुढे भातखळकरांनी म्हटले आहे की, शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहत असल्याचेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे की, ‘कोव्हिड-१९ हा जागतिक महामारीच्या दूसऱ्या लाटेने महाराषट्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, कोरोना विषाणूची संक्रमण-साखळी तोडावयाची असल्याने पुन्हा एकदा संचारबंदीचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. परिणामी व्यवसाय-धंदे बंद करण्यात आले आणि पुन्हा एकदा हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. ह्या पार्श्वभूमीवर हॉटल-रेसटॉरंट,आदरातिथ्य उद्योगातील काही प्रतिनिधीनी त्यांना भेडसवणाऱ्या समस्या मला अवगत केल्या, सर्वच समस्यांचे निराकरण ह्या अभुतपूर्व परिस्थितीत जिकिरीचे असले तरी काही मागण्यांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. एफल-३ परवानाधारक हॉटेल-परमीटबार मालकाना अबकारी कराचा भरणा किसान ४ हफ्त्यांमध्ये करण्याची सवलत यावी. वीज बिलात सवलत मिळावी तरोच मालत्ता करात सूट मिळावी अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -