घरताज्या घडामोडीमुंबईतील नुकसानग्रस्तांनाही मदत करा नाहीतर तीव्र आंदोलन करु, भातखळकरांचा इशारा

मुंबईतील नुकसानग्रस्तांनाही मदत करा नाहीतर तीव्र आंदोलन करु, भातखळकरांचा इशारा

Subscribe

राज्याचे पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळता कामा नये अन्यथा भाजप तीव्र आंदोलन करेल

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका, अन्यथा मुंबई भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर केली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मदत पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी मुंबईतील नुकसानग्रस्त नागरिकांनाही विसरु नका असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. पूरग्रस्त, दरडग्रस्त नागरिकांना सर्व मदत करा पाणी, विज, आणि अन्नाची सोय करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, चिपळूण, सांगली कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांना मदत करताना सर्व निकष बाजूला ठेवून विशेष मदत करणार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. ही मदत करताना मुंबईतल्या नुकसानग्रस्त नागरिकांना विसरू नका एवढीच भाजपची मागणी आहे. कारण मुंबईतसुद्धा पाणी अफाट भरलं, २६ जुलै रोजी सारख भरलं, इथले चाळकरी, व्यापारी, झोपडपट्टी धारक, मध्यमवर्गीय यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान या पवसामुळे झाले आहे. यामुळे मुंबईतल्या सर्वसामान्य माणसालासुद्धा मिळाली पाहिजे. ही पुन्हा एकदा मागणी करत आहोत. राज्याचे पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळता कामा नये अन्यथा भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारचा कोयनानगर दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला असला तरी कोयनानगर येथील दरडग्रस्त नागरिकांना मदत पोहचवण्यास कोणताही विलंब होता कामा नयेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. खराब हवामानामुळे उद्धव ठाकरे यांना सातारा दौरा रद्द करावा लागला. मात्र दौरा रद्द झाला असला तरी त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिले. सातारा जिल्हाधिकारी तसेच इतर यंत्रणांकडून माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. अद्याप या भागातील पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही, हवामानाचासुद्धा अडसर आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बचाव कार्य करावे. पूरग्रस्तांना तातडीने अन्न, कपडे, औषधांची मदत करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -