Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी वसुली सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्री नव्हे तर सिल्व्हर ओक, अतुल भातखळकर यांचा...

वसुली सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्री नव्हे तर सिल्व्हर ओक, अतुल भातखळकर यांचा आरोप

प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरात(कडी) बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झालाय - अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. पटोले यांचे वक्तव्य १०० टक्के सत्य असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्री नव्हे तर सिल्व्हर ओक असल्याचा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर हे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत असतात. राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोट शरद पवार आहेत असं नाना पटोले यांना सुचवायचे आहे का? असा सवालही अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले म्हणतायत महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचाच नाही तर राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोटही तेच आहेत. असे नाना पटोले यांना सुचवायचे आहे का? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. दरम्यान पुढे भातखळकर यांनी म्हटलं आहे की, प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरात(कडी) बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झालाय असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

- Advertisement -

रावसाहेब दानवे यांची टीका

भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या धुसपूस आणि नाराजीवर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत. परंतु काँग्रेसची देशात किती ठिकाणी सत्ता आहे. याबाबत काँग्रेसनं तपासलं पाहिजे. तसेच जर काँग्रेस स्वबळाचा नारा देत असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पोटात दुखायचे कारण नाही. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी सरकार एकत्र स्थापन केलं आहे. पक्ष एकत्र केला नाही यामुळे प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार जरी एकत्र चालवत असली तरी आगामी निवडणुकीमध्ये एकत्र लढायचे की स्वबळावर लढायचं हा त्यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे. राज्यातील सरकार हे अमर, अकबर,एँथनीचे सरकार असल्याचा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

नाना पटोले काय म्हणाले

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार असल्याचे म्हटलं आहे. शरद पवार आमच्यासाठी आदरणीय आहेत. पक्षश्रेष्ठींनी राज्यातील काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची जबाबदारी दिली असून ती मी पार पाडणार आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेवर मी हल्ला करत नाही आहे. आमचा भाजपला विरोध असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांना नाना पटोलेंच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता छोट्या माणसांबद्दल बोलणार नाही असं वक्तव्य पवार यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -