घरताज्या घडामोडीहे तर निबर कातडीचे संवेदना हरवलेले सरकार, अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हे तर निबर कातडीचे संवेदना हरवलेले सरकार, अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का?

एमपीएससी परीक्षा उत्तीण झाल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला गेले नसून स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावरुन भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. हे निबर कातडीचे सरकार असून संवेदना हरवलेले सरकार असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना स्वप्नील लोणकरच्या घरी जाता आले नसते का? असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये, “अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार” असे म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केलं होते परंतु स्वप्नील लोणकरच्या घरी जाऊन सांत्वन करणं टाळलं असल्यामुळे भाजपने निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी लोणकर कुटुंबीयांचे केलं सांत्वन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत स्वप्नील लोणकरच्या आई, वडील, आणि बहिणीची विचारपुस केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना धीर देत आम्ही तुमच्यासोबत आहोत काळजी करु नका असं म्हटलं आहे. आई वडीलांचे सांत्वन केलं तसेच स्वप्नीलची बहिण पूजाच्या पुढील शैक्षणिक खर्चाची सर्व मदत करण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिंदे यांनी गुरुवारी त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. याप्रसंगी, शिंदे यांनी स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -