‘ठाकरे’ चित्रपटात पॉपकॉर्न ऐवजी घ्या वडापावचा आस्वाद

'ठाकरे' चित्रपटात पॉपकॉर्न ऐवजी प्रेक्षक घेणार चटपटीत अशा शिव वडापावचा आस्वाद

audience can enjoy shiv vada pav while watching thackeray movie instead of popcorn
'ठाकरे' चित्रपटात पॉपकॉर्न ऐवजी घ्या वडापावचा आस्वाद

असे खूप कमी चित्रपट असतात, ज्यांची मुहूर्तापासून चर्चा होते. ‘ठाकरे’ हा त्यातलाच एक सिनेमा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांसमोर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटादरम्यान, प्रेक्षकांना पॉपकॉर्न ऐवजी वडापावचा आस्वाद घेता येणार आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेला उपलब्ध असलेला आणि सर्वसामान्यांचे पोट भरणारा चटपटीत अशा शिव वडापाची राष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांना चव चाखता येणार आहे.

७२ निवडक कार्निवल सिनेमा थिएटर्समध्ये वडापाव उपलब्ध

बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रिय व्यक्तीमत्वाप्रमाणेच लोकांचे आवडते खाद्य असलेल्या वडापावचा राष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांना आस्वाद घेता येणार आहे. या चित्रपटादरम्यान, स्टार्टर्स म्हणून वडापाव देण्याचा मानस निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. निर्मात्यांच्या विचाराला पाठिमबा देत ७२ निवडक कार्निवल सिनेमा थिएटर्समध्ये प्रेक्षकांना वडापाव उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पाककृती पाहता येणार

पॅन – इंडिया मार्केटिंगच्या पुढाकाराने टेंट कार्ड्स, वेबसाइट बॅनर, सिनेमा स्लाइड्स आणि एसएमएस मोहीम यांद्वारे काही महाराष्ट्रीयन पाककृती राष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर केल्या जाणार आहेत. त्यामुळे वडापावची चव चाखताना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देखील मराठमोळ्या अशा महाराष्ट्रीयन पाककृती पाहता येणार आहेत.

चित्रपटाविषयी थोडक्यात

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास संजय राऊत यांनी जवळून अनुभवला आहे. म्हणूनच संजय राऊत यांनी या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती केली आहे.तर अभिजीत पानसे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेता नवाजउददीन सिद्दीकी दिसणार आहेत. तर मीनाताईंच्या या भुमिकेसाठी अमृता रावची निवड करण्यात आली आहे.


वाचा – ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करा – भाजप